Breaking News

*नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिर* *नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या हस्ते करण्यात आले*

*नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिर*

*नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या हस्ते करण्यात आले*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि –  दिलीप येवले

नागपुर:- आज दिनांक 27.9.2021 रोजी सकाळी 10.00 वाजता नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन आयुधं निर्माण वसाहत, मनोरंजन सभागृह क्लब नं.2. खापरखेडा कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते. सावनेर येथील सुप्रसिध्द जे.एस.के.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील नेत्र तज्ञ डॉ. जयंत श्रीराम कडू ( MBBS,DNB,FVR) डॉ. आय एन. खान (D.O.B.O moptm दृष्टी तज्ञ) व त्यांची चमू यांनी शिबिरामध्ये नेत्र तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटक खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे अनिल काठोये (उपमुख्य अभियंता ), परमानंद रंगारी (उपमुख्यअभियंता), पुरुषोत्तम मानकर (कामगार नेता व गुणवंत कामगार) शंकर घोरसे (कामगार नेते व कवी) दिलीप येवले (पत्रकार ) यांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व विधीवत पुजन करून राजू घुगे तसेच मान्यवराच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन केले. पाहुण्यांचे स्वागत व मनोगत घेण्यात आले. घुगे साहेब मुख्य अभियंता यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात .शिबिराचे औचित्य साधून कामगार कल्याण अधिकारी गट क्रमांक 2 प्रतिभा भाकरे यांनी मंडळाच्या योजनांची माहिती दिली. UNICEF व मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या महत्वाकांक्षी उपक्रमाची( ऑनलाईन प्रशिक्षणाची) माहिती देण्यात आली. कामगार कल्याण केंद्र खापरखेडा 21 वर्षापासून ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत जीर्ण झालेली असून केंद्राला नवीन जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन घुगे साहेब यांच्या कडे करण्यात आले. त्यांनी नवीन जागेला सहमती दिली. यावेळी श्रमकल्यान युग अधिक कामगारांपर्यंत पोहचावे करिता मुख्य अभियंता यांच्या माध्यमातून प्रत्येक ठेकेदारांना सूचना दिल्या जाव्या ही विनंती करण्यात आली. तसेच सर्व ठेकेदारांनी निधी भरावा याबाबतही घुगे साहेब यांच्या मार्फत सूचना द्याव्या ही विनंती ही करण्यात आली. शिबिराला केंद्राच्या केंद्र महिला कल्याण सहाय्यक शालू टेकाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिबिराला 204 लाभ्यार्थ्यानी लाभ घेतला. यामध्ये कमी दरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. ज्यांचे क्रिटिकल प्रॉब्लेम होते त्यांना ESIC व mediclaim द्वारे पुढील उपचार सुचविण्यात आले. शिबिराचे संचालन व आभार प्रदर्शन कामगार कल्याण अधिकारी यांनी केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …