Breaking News

*विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा ची सहविचार सभा संपन्न* *आता करूया निर्धार जिंकण्याचा*

*विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा ची सहविचार सभा संपन्न*


*आता करूया निर्धार जिंकण्याचा*

वर्धा प्रतिनिधी –  सुरेश बरे

वर्धा- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा ची सहविचार सभा रविवार दि.26 सप्टेंबर 2021 ला आरिया सेलिब्रेशन हॉल, नागपूर रोड वर्धा येथे संपन्न झाली. यावेळी मंचावर सहविचार सभेचे अध्यक्ष म्हणून मा. श्री व्ही. यू. डायगव्हाणे सर (माजी शिक्षक आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबई ) तर प्रमुख पाहुणे म्हणून विमाशीचे प्रांतीय अध्यक्ष मा. श्री श्रावणजी बरडे, विमाशीचे सरकार्यवाह तथा विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक आमदार निवडणूक 2022 चे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार मा. श्री सुधाकरजी अडबाले, विमाशीचे प्रांतीय उपाध्यक्ष मा. श्री जयप्रकाश थोटे, विमाशीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री राजू चंदनखेडे, खाजगी प्राथमीक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. श्री रवीबाबू शेंडे, सचिव मा. श्री सुरेशकुमार बरे, विमाशीचे मार्गदर्शक मा. श्री विजयसिंह चंदेल, कार्यवाह मा. श्री महेंद्र सालंकार, मा. श्री लक्षमणराव धोबे, मा. श्री जूनघरी सर, मा. सौ पुष्पाताई डायगव्हाणे, विमाशीच्या सहकार्यवाह मा. कु. मंदाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.*


*यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेले अनेक प्रश्न जसे जूनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न,वरिष्ठ व निवड श्रेणी, वेतनेत्तर अनुदान, उच्च माध्यमिक , आदिवासी शाळा , अध्यापक विद्यालय, सैनिकी शाळांतील तसेच इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेन्ट शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, शिक्षक समायोजन, शिक्षक भरती, संचमान्यता त्रुटी, वेतन एक तारखेला न होणे, बंद असलेली बिडीएस प्रणाली, प्रलंबित मेडिकल बिले, प्रलंबित पेन्शन प्रस्ताव, प्रलंबित पेन्शन ग्रॅच्युइटी, अंशराशिकरण आदी विविध प्रलंबीत समस्या सोडविण्यासाठी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हीत व अस्मिता जोपासण्यासाठी आगामी निवडणुकीत विमाशीचा आमदार निवडून आणणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अथक परिश्रम करण्याची ग्वाही दिली.*

*अध्यक्षीय भाषणात मा. श्री व्ही. यू. डायगव्हाणे सर यांनी सांगितले की दिवसेंदिवस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांची वाढती संख्या ही विद्यमान लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. सभागृहात विविध आयुधांचा वापर करून प्रलंबीत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात विमाशीचा उमेदवार सभागृहात पाठविणे आवश्यक आहे व त्यासाठी सर्वांनी एकजुटीने अथक परिश्रम घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.*


*यावेळी सहविचार सभेला उपस्थित सर्वांनी आगामी निवडणुकीत विमाशीचे उमेदवार मा. श्री सुधाकरजी अडबाले सर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.*

*सदर सहविचार सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धाचे सर्व जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी विमाशीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. सहविचार सभेचे संचालन व प्रास्ताविक विमाशीचे कार्यवाह श्री महेंद्र सालंकार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री प्रमोद खोडे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष श्री शशांक हुलके यांनी मानले*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …