*अखेर तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्ग मोकळा , ३० सप्टेंबर पासुन जड वाहतुक बंद होणार*
*कन्हान नगर परिषद येथे झालेल्या बैठकीत निर्णय*
*३० सप्टेंबर पासुन जड वाहनांवर कारवाई करा – आमदार आशिष जयस्वाल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती चे ओव्हर लोड जड वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिकांना द्वारे संबंधित अधिकार्यांना निवेदन पत्र देऊन जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असताच कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये संबंधित विभागाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करुन कन्हान शहरातुन होणारी जड वाहतुक ३० सप्टेंबर पासुन बंद करावे असे दिशा निर्देश आमदार आशिष जयस्वाल यांनी ट्रांसपोर्टर यांना दिले असुन जर जड वाहतुक सुरु राहिल्यास जड वाहनांवर कारवाई करा अस निर्देश आमदार आशिष जयस्वाल यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे व आरटीओ अधिकारी काळे यांना दिले आहे .
कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती व इतर प्रकारचे १४ चाकी , २० चाकी व इतर जड वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु असुन हा मार्ग १० ते १२ फुटाचा असल्याने लहान गाड्यांना जाण्या येण्या करिता व तेथील स्थानिक नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी आमदारांना , कन्हान पोलीस प्रशासनाला , कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासनाला व संबंधित अधिकार्यांना निवेदन देऊन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असताच सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ ला दुपारी १:०० वाजता कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली जड वाहतुक च्या मुद्यावर चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले होते . या मध्ये पाहुणे मंडळीचे स्वागत करुन सभेची सुरवात करण्यात आली असता आमदार आशिष जयस्वाल यांनी ट्रांसपोर्टर मालका समोर विविध प्रश्न मांडले असुन ट्रांसपोर्टर मालकांनी सुद्धा आमदार आशिष जयस्वाल यांच्या समोर विविध समस्या ठेवल्याने आमदार आशिष जयस्वाल यांनी ट्रांसपोर्टर मालकाना म्हटले कि तुमच्या ज्या समस्या असतील त्या संबंधित मला एक पत्र द्या त्यावर चर्चा करुन आठ ते पंधरा दिवसात मार्ग काढु असे आश्वासन दिले तसेच आमदार आशिष जयस्वाल यांनी कन्हान पोलीस प्रशासन , नगर परिषद प्रशासन , आरटीओ अधिकारी , तहसीलदार , नागरिकांन सोबत व ट्रांसपोर्टर मालकानां सोबत व संबंधित अधिकार्यांन चर्चा करुन कन्हान शहरातुन होणारी जड वाहतुक ३० सप्टेंबर पासुन बंद करण्याचे आदेश आमदार आशिष जयस्वाल यांनी ट्रांसपोर्टर मालकानां दिले आहे व जड वाहतुक बंद न झाल्यास जड वाहनांवर कारवाई करा असे निर्देश आमंदार आशिष जयस्वाल यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , आरटीओ अधिकारी श्री काळे , यांना दिले आहे .
या बैठकी मध्ये कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक व माजी उपाध्यक्ष योगेन्द्र रंगारी , अनिल ठाकरे , राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , नगरसेविकां संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , सुषमा चोपकर , रेखा टोहणे , वंदना कुरडकर , पुष्पा कावडकर , गुंफा तिडके , शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , शहर प्रमुख छोटु राणे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले , वैशाली खंडार , वरिष्ठ पत्रकार मालवीय सर , फिरोज बिसेन , प्रवीण गोडे , श्रवण वतेकर , सुरेश चावके , अशोक पाटिल , चिंटु वाकुडकर , समशेर पुरवले , रिंकेश चवरे , मयुर माटे , सचिन वासनिक , अमन घोडेस्वार , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .