Breaking News

*येरखेडा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या*

*येरखेडा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या*


*प्रतिनिधी राजू मदनकर*

*कामठी-  नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील तेलीपुरा तेरखेडा येथील तरुणाने स्वतःचे राहते घरात दोराने छताच्या पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी सहा वाजता सुमारास उघडकीस आली* *नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलीपुरा येरखेडा येथील अमित केशव खते वय 27 याने स्वतःचे राहते घरी दोराने छताच्या हुकाला दोराने लटकून आत्महत्या केली सायंकाळी सहा वाजता सुमारास आई बाहेरून कामावरून घरी परत आली दार उघडले असता अमित। छताच्या हुकाला दोराने लटकलेल्या अवस्थेत दिसताच हंबरडा फोडला व शेजाऱ्यांना बोलावून त्याला खाली उतरवले तोपर्यंत मरण पावला होता*
*घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशनला दिली असता पोलिस घटनास्थळी येऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदणासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात येथे पाठविले असून नवीन कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस पुढील तपास करीत आहे अमित हा उप्पलवाडी परिसरातील एका खाजगी कंपनीत काम करीत होता आजच सकाळी कामावरून परत आल्याचे सांगण्यात आले आत्महत्याचे कारण कळले नाही*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …