*बेलदा येथे गो आधारित शेंद्रीय शेती प्रशिक्षण वर्गाचे थाटात उदघाटन*

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक – विश्व हिंदू परिषद व गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांच्या संयुक्त विद्यमाने गो-आधारित दोन दिवसीय सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून थाटात पार पडले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय समरसता प्रमुख श्री गणेश जी मोकाशी प्रामुख्याने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक पंचायत समितीचे उपसभापती रविंद्रजी कुमरे ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जी भांडारकर शिवलाल खंडाते मंगलाबाई वरखडे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे, रामटेक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कृषी घोरपडे, उपसरपंच द्रोपदीताई वरखडे, प्रशिक्षक संदीपजी गुजर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या शांताताई कुमरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम कोणते तसेच सेंद्रिय शेती कशी फायदेशीर आहे आणि का करावी हे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना समजावून सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गणेशजी मोकाशी यांनी यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी बेलदा ग्रामपंचायत व लगतच्या परिसरातील मोठया प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम डडमल यांनी तर आभार प्रदर्शन मंगलप्रसाद यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज