*डॉ.अनुश्री माहुरकर यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२१ चा सन्मान*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- श्री सच्चीदानंद शिक्षण संस्थेद्वारा संचालित शारीरिक शिक्षण महाविद्यालय कोराडी येथील प्राध्यापक डॉ.अनुश्री माहुरकर यांना २०२१ चा “आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फोंडेशन कोल्हापूर” तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. डॉ. अनुश्री माहुरकर यांना हा पुरस्कार आविष्कार फाऊंडेशनच्या नागपुर जिल्हा सचिव डॉ. पौर्णिमा काप्टा आणि आविष्कार फाऊंडेशन ऑल इंडियाचे सचिव व प्राचार्य डॉ॰ अशोक काप्टा यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
डॉ. अनुश्री माहूरकर या २२ वर्षांपासून शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. क्रीडा क्षेत्रात तसेच महाविद्यालयात त्यांचे योगदान उल्लेखनिय आहे. प्रत्येकांना मदत करण्याचा त्यांचा विशेष गुण व त्यांच्या धाडसीवृत्तीमुळे डॉ. अनुश्री माहूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना हा पुरस्कार प्रदान होताच आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक श्री संजय पवार, सच्चीदानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बबनराव तायवाडे, तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. शरयू तायवाडे , शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक कवीश्वर, डॉ. मुनिर अली, श्री.विनोद ठाकरे , दीपक मडावी,अतुल सी. आचारी, यांनी त्यांचे कौतुक केले.
डॉ. माहूरकर यांनी हा पुरस्कार आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत स्वीकारला असून त्यांनी आविष्कार फाऊंडेशनचे मनापासुन आभार मानले .
Maharashtra News Media सच की आवाज