Breaking News

*अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल स्वार ठार*

*अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल स्वार ठार*

*कट्टा शिवारातील घटना*

*प्रतिनिधी राजु मदनकर*

*देवलापारनागपुर जबलपुर महामार्गावर देवलापार पासुन तीन किमी अंतरावर कट्टा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल स्वार ठार झाला.*
*म्रुतकाचे नाव ताराचंद यशवंत कोडवते ५० रा सिलारी असे सांगण्यात येते.*
*आज देवलापार येथे मंडईचा कार्यक्रम असल्याने ताराचंद हे देवलापारला आले होते. परत जात असतांना कट्टा शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिली धडक ईतकी जोरदार होती की, तराचंद यांचा घटनस्थळीच म्रुत्यु झाला. ताराचंद हे सिल्लारी येथिल रहिवासी असुन ते शेतकरी मजुर होते. त्याच्या अपघाताची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी पोहचले ताराचंदचा घटनास्थळीच म्रुत्यु झाला होता.त्यांना देवलापारच्या ग्रामिण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी म्रुत घोषीत केले. ताराचंद यांचे मागे दोन मुले व पत्नी असा परीवार आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …