*जिल्हा परिषद व पंचायत समीतीची निवडणूक शांतते पार पडली*
*आज 6 ऑक्टोंबर ला होणार मतमोजनी*
विशेष प्रतिनिधि
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 16 जिल्हा परिषद गट व 31 पंचायत समिती गणासाठी आज झालेली पोटनिवडणूक शांततेत पार पडली. कोरोना साथीच्या सावटानंतर झालेल्या या निवडणुकीला मतदारांनी हवातसा प्रतिसाद दिला नाही.*
*आज दिनांक ६ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.*
*मंगळवारी शेवटचे वुत्त हाती आले तोवर जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी व पंचायत समितीच्या 31 गणांसाठी जिल्ह्यामध्ये जवळपास 50 टक्के मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत ही टक्केवारीत काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.*
*जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिंग पार्ट्या प्रत्येक तालुक्याच्या तहसिल व निर्धारीत मतमोजणी कार्यालयात येत असून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील अधिकृत टक्केवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.*
*सदर पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सोळा गटांसाठी 79 तर पंचायत समितीच्या 31 गणांसाठी 125 उमेदवार रिंगणात भाग्य आजमावत आहे. जिल्ह्यातील एकुण सहा लक्ष सोळा हजार सोळा मतदार असून त्यांच्याकरिता 1 हजार 115 केंद्रावर मताधिकाराची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली होती.*
*आज दुपारपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नरखेड पंचायत समिती सभागृह, काटोल येथे प्रशासकीय इमारत, कळमेश्वर येथील तहसील कार्यालयातील तळमजला, सावनेर येथे तहसील कार्यालय, रामटेक येथे घनश्याम किंमतकर सभागृह, मौदा, कामठी, नागपूर ग्रामीण, हिंगणा, उमरेड, कुही, भिवापूर या ठिकाणची मतमोजणी तहसिल कार्यालयात इत्यादी ठीकाणी सकाळी १० पासून सुरू होणार आहे.*