Breaking News

*सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा*

*सावनेर येथे लियाफी चा ५७ वा स्थापना दिन साजरा*

सावनेर – येथील राम गणेश गडकरी सभागृहात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 57 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. कमलाकर देशपांडे, प्रमुख पाहुणे लियाफीचे माजी विभागीय अध्यक्ष शेषराव धुंदाड, शाखा व्यावस्थापक युवराज हातझाडे, उपशाखा व्यवस्थापक शैलेश तोताडे, विकास अधिकारी अतुल कुलकर्णी व भुपेश वंजारी लियाफी शाखा सावनेर चे अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, कोषाध्यक्ष दीपक निखाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली तर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षेत 85% पेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व उत्कृष्ट कार्य केलेल्या अभिकर्ता यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित अभिकर्ता यांना प्रमुख पाहुण्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. देशभरात कोरोना या साथीच्या रोगाने मृत्यु झालेल्या अभिकर्ता, व सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मंच संचालन मनिषा नान्हे व धवल डुंमरे यांनी तर आभार प्रदर्शन रितेश सुर्यवंशी यांनी केले
एल आय सी निगम गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अभिकर्ता यांनी प्रयत्न केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …