Breaking News

*मोवाड येथे २७ वी महात्मा फुले सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा संपन्न* *कोविड नियमांचे काटेकोर पालन करत*

*मोवाड येथे २७ वी महात्मा फुले सहकारी संस्थेची वार्षिक आमसभा संपन्न*

*कोविड नियमांचे काटेकोर पालन करत*

नरखेड तालुका प्रतिनिधी  -श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – सत्य शोधक समाज चे प्रयणेते महात्मा ज्योतीराव फुले यांचे सामाजिक एकतेच्या विचावर प्रभावीत होऊन व

” विना सहकार नाही उध्यार “

या त्त्वावार ही संस्था अविरत गोरगरीब जनतेला कठीण आर्थिक परिस्थिती च्या वेळला मदतीच्या हात देणारे संस्थेच्या
दि.30/09/2021 रोज गुरुवार ला दुपारी 12 वाजता महात्मा फुले सहकारी संस्था मोवाडची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत सामाजिक दुरी बाळगून व उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून संस्थेच्या सभामंडपात मर्यादीत सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी संस्थेने 27 वर्षात केलेल्या प्रगतीचा व व्यवहाराचा आढावा सभासदांपुढे मांडण्यात आला. या सभेला संस्थेचे अध्यक्ष धनराज देवघरे, उपाध्यक्ष राजेंद्र ढेपले, व सन्माननीय संचालक जगदीश वाडबुद्धे ,मारोतराव मानकर,नीलकंठ कोरडे,प्रमोद हेडाऊ, अविनाश गजभिये, मनोज तरार, प्रदीप उज्जैनकर,गाडगे गुरुजी,, प्रकाश पूरी, देवका चापेकर, रेखा नेरकर आदी उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी अध्यक्ष यादवराव घावडे व सुरेश खसारे माजी नगर परीषद नगराध्यक्ष उपस्थित होते. तसेच मोवाड शहरात महात्मा फुले संस्था च्या सहकार्य ने कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या कठीण काळात कोविड रुग्णाणा लागणारे रक्त हे मिळणे कठीण होते .यामुळे अनेकांना आपल्या जिव गमवावा लागला पण या परिस्तिथीत ही नागपूर मेडिकल शासकीय रक्त पेढीच्या सहकार्य ने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.अशा अनेक सामाजिक उपक्रम मध्ये ही संस्था नेहमी च अग्रेसर असते. संस्थेचे वार्षिक आम सभेच्या विषयांचे वाचन व्यवस्थापक पुरुषोत्तम अवझेकर यांनी केले तर सभेचे सुत्र संचालन रितेश कोरडे यांनी करून उपस्थित सन्माननीय महोदयांचे आभार हर्षदा रमेश राजगुरु हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी भालचंद्र ढोरे,गितेश कनिरे,केशव वालुलकर, विलास निमकर,रमेश खोपे आदींनी सहकार्य केली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …