Breaking News

*भाजपा शहर नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार* *भाजपा पारशिवनी तालुका अनु:सूचित जाति मोर्चा द्वारे आयोजन*

*भाजपा शहर नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार*

*भाजपा पारशिवनी तालुका अनु:सूचित जाति मोर्चा द्वारे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी,अनु:सुचित जाती मोर्चा, युवा मोर्चा आघाड्यांची घोषणा करण्यात आल्याने भाजपा पारशिवनी तालुका अनुसुचित जाती मोर्चा पदाधिकार्यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवास स्थानी जाऊन त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
भाजपा पारशिवनी तालुका कन्हान शहर द्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक येथे करण्यात आले असुन या कार्यक्रमात भाजपा कन्हान शहराची विविध आघाडी च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री च्या नावाची घोषणा करण्यात आली असुन यात भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साकोरे, महिला आघाड़ी अध्यक्षा तुलेषा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के, महामंत्री बबलीताई छानीकर, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत सोलंकी, उपाध्यक्ष रंजीत शिंदेकर, अनु:सुचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी, महामंत्री अजय लोंढे, महामंत्री चंन्द्रगुप्त पानतावने, उपाध्यक्ष दिपनकर गजभिये अश्या नवनियुक्त पदाधिकार्यांची नियुक्ती करून घोषणा करण्यात आल्याने भाजपा पारशिवनी तालुका अनुसुचित जाती मोर्चा पदाधिकार्यांनी अध्यक्ष लीलाधर बर्वे यांच्या नेतृत्वात व भाजपा नागपुर जिल्हा अनुसुचित जाती मोर्चा मंत्री रिंकेश चवरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा कन्हान शहर विविध आघांड्यांच्या नवनियुक्त पदाधिकारी च्या निवास स्थानी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ स्वाती मनोहर पाठक यांची भाजपा महीला आघाडी नागपुर ( ग्रामिण) जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त झाल्याबद्दल भाजपा पारशिवनी तालुका अनुसुचित जाती मोर्चा पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष लिलाधर बर्वे, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हा मंत्री रिंकेश चवरे , महामंत्री सचिन वासनिक, भाजपा पारशिवनी तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके, भाजपा कन्हान शहर प्रसिद्धी प्रमुख ऋृषभ बावनकर, मयुर माटे, अमन घोडेस्वार, दिनेश नानवटकर आदी भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …