Breaking News

*कोळसा खदन येथे पकडला १२ – १३ फुटाचा अजगर* *सर्प मित्रांनी जंगलात सोडुन दिले जिवदान*

*कोळसा खदन येथे पकडला १२ – १३ फुटाचा अजगर*

*सर्प मित्रांनी जंगलात सोडुन दिले जिवदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरा पासुन ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या कोळसा खदान नंबर ६ टेकाडी येथे श्रीराम खरवाल यांच्या शेतात अजगर प्रजातीचा साप दिसल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याने खदान नंबर ६ चे ग्रामपंचायत सदस्य साकिर सिद्दीकी ने टेकाडी च्या सर्पमित्रा ना बोलावुन अजगर ला पकडुन त्यांनी जंगलात नेऊन सोडुन सापाला जिवनदान दिले.
शुक्रवार दिनांक.१ ऑक्टोंबर २०२१ ला सकाळ च्या सुमारास कोळसा खदान नंबर ६ टेकाडी येथे श्रीराम खरवाल यांच्या शेतात १२-१३ फुट अजगर प्रजातीचा साप दिसल्याने शेत मालक श्रीराम खरवाल यांनी ही माहिती कोळसा खदान नंबर ६ चे ग्रामपंचायत सदस्य साकिर सिद्दीकी यांना दिली असता त्यांनी टेकाडी रहिवासी सर्प मित्र वैभव मेश्राम, कैलास मनगटे यांना फोन करून माहिती दिली असता ते जास्त वेळ न लावता तात्काळ श्रीराम खरवाल यांच्या शेतात पोहचुन त्यांनी अजगर प्रजातीच्या सापाला व्यवस्थित पकडुन त्यानी मनसर – माहुली च्या जंगलात नेऊन सोडुन अजगर सापाला जिवनदान दिले. या प्रसंगी महेंद्र भुरे, शाकिर सिद्दीकी, शकिल सिद्दीकी, कृष्णा इंगोले, धर्मेंद्र गोसाई, रामप्रकाश शर्मा सह उपस्थित नागरिकांनी सहकार्य केले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …