Breaking News

*ईतर मंदीराप्रमाणे नागपुर येथील जगप्रसिध्द दिक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पँलेस उघडण्याची परवानगी द्या* *महादुला- कोराडी येथील डाँ. बाबासाहेबांचे पाईक 10 हजार सह्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविणार*

*ईतर मंदीराप्रमाणे नागपुर येथील जगप्रसिध्द दिक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पँलेस उघडण्याची परवानगी द्या*

*महादुला- कोराडी येथील डाँ. बाबासाहेबांचे पाईक 10 हजार सह्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविणार*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले*

नागपुर – एकीकडे राज्य शासनाने महाराष्ट्रतले संपुर्ण मंदीरे उघडण्यांची परवानगी दिलेली असून मात्र बौध्द अनुयायाचे मन दुखावलेले आहे कारण कि तथागत गौतम बौध्द व परम पुज्यनीय डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र स्थान उघडण्याची अघ्यापही शासनाने परवानगी न दिल्याने बौध्द बांधव व अनुयायामध्ये नाराजी दिसून येत आहे. 14 आक्टोंबर, धम्मचक्र परिवर्तन दिन, दसरा सारखे सणासुदीच्या दिवशी बौध्द बांधव व बाबासाहेबांचे अनुयायी देश, परदेशांतुन पायी, रेल्वे व्दारे प्रसिध्द नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दिक्षाभूमी तसेच कामठी येथिल जगप्रसिध्द ड्रॅगन पँलेस येथे मोठ्या आनंदात उत्सहात दुरून दुरून बाबासाहेबांचे अनुयायी दर्शनाकरिता येतात. मात्र यंदाहि नागपुर येथील डाँ. बाबासाहेबाची दिक्षाभुमी व कामठी येथील ड्रॅगन पँलेस चे व्दार बंद असतील त्यामुळे डाँ. बाबासाहेबांचे पाईक व अनुयायी यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात खंत व्यक्त केली आहे.

*पवित्र नवरात्रि उत्सव मोठ्या आनंदात उत्सहात साजरी करण्याकरिता मंदीरे जोमाने तयारी करण्याकरिता लागलेली असून शासनाने मंदीरे येत्या 7 आँक्टोबर पासून उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली असून मात्र एकीकडे बौध्द अनुयायाचे पवित्र स्थान असलेले नागपुर येथील दिक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पँलेस याला उघडण्याची परवानगी न मिळाल्याने बौध्द अनुयायाी यांचा भावना दुखावल्यामुळे दहा हजार सह्याचे निवेदन नागुरचे जिल्हाधिकारी विमला राव यांना देण्याचे आश्वासन नगर पंचायत महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दुखतं भावना प्रसारमाध्यमांव्दारे व्यक्त केली आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …