*कन्हान येथील विविध मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सव*
*कावड यात्रा चे आयोजन सह विविध कार्यक्रमाचे आयोजन*
*शासनाच्या नियमाचे पालन करुन नवरात्र महोत्सव साजरा करा – नगर परिषद प्रशासनाचे नागरिकांना आव्हान*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . परंतु गेल्या दोन वर्षा पासुन देशात राज्यात , जिल्ह्यात शहरात व परिसरात कोरोना च्या महामारी मुळे या उत्साहा वर ब्रेक लागला असुन या वर्षी शहरात व परिसरात कोरोना च्या प्रार्दुभाव नसल्यामुळे शहरातील विविध मातेच्या मंदिरात घटस्थापना करुन , पुजा अर्चना करुन व विविध कार्यक्रमाने ह्या नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे .
या मध्ये कांन्द्री कन्हान येथील शीतला मातेच्या मंदिरात आज ७ आॅक्टोंबर ला दुपारी १२:३० वाजता घटस्थापना राहुल पोटभरे , व गणेश शर्मा या परिवारांच्या हस्ते होणार असुन १३ आॅक्टोंबर ला हवन , पुजा पाठ , आरती व प्रसाद वितरण होणार असुन १४ आॅक्टोंबर ला दुपारी १२:३० वाजता मंदिरात घट विर्सजन करणार असुन , सायंकाळी ६:३० वाजता कन्या भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन रोज सकाळी ७ व सायंकाळी ७:३० वाजता आरती होईल . कार्यक्रमाच्या यशस्विते करिता संजय चौकसे , दिलीप मरघडे , अशोक खैरकर , चंन्द्रशेखर बावनकुळे , वामन देशमुख , सह आदि नागरिक सहकार्य करत आहे . तसेच कन्हान रामनगर गुरफुडे ले आऊट येथील माॅ जगदंम्बा मातेच्या मंदिरात आज दुपारी सायंकाळी ४:०० वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे . तसेच या नवरात्र महोत्सव निमित्य सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ द्वारे कावड यात्रा काढुन घटस्थापना करुन व विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव चा शुभारंभ करण्यात येणार आहे . या मध्ये केशरीचंद खंगारे , प्रशांत मसार , राधेश्याम भोयर , पवन भोयर , खुशाल येलमुले , आकाश भगत सह आदि नागरिक सहकार्य करत आहे .

*कावड यात्रा चे आयोजन*
कन्हान शहरात घटस्थापने च्या दिवशी मोठ्या प्रमाणात कावड यात्रा चे आयोजन करण्यात येते परंतु गेल्या दोन वर्षा च्या कालावधी मध्ये शहरात कोरोना चे प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात असल्याने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले नाही परंतु या वर्षी शहरात कोरोना चा प्रादुर्भाव नसल्याने आज गांधी चौक कन्हान ते पिपरी येथील दुर्गा मंदिरा पर्यंत कावड यात्रे चे आयोजन करण्यात आले आहे .
*शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करुन नवरात्र महोत्सव साजरा करा – नगर परिषद प्रशासन*
महाराष्ट्र राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव अजुनही आटोक्यात न आल्याने राज्य शासना च्या कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन नवरात्र महोत्सव साजरा करा तसेच कोरोना विषयक सुचनांने पालन न केल्यास योग्य कार्यवाही करण्यात येईल असे कडकडीचे आव्हाहन कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासन द्वारे करण्यात आले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज