*प्लाॅस्टिकमुक्त भारत अभियानाला सुरुवात*
*अमृत महोत्सव निमित्य कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील खंडाळा व गहुहिवरा ग्रामपंचायत द्वारे अमृत महोत्सव निमित्य व महात्मा गांधी , लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्य प्लाॅस्टिकमुक्त भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली .
मंगळवार दिनांक ५ आॅक्टोंबर ला भारतीय स्वातंत्र्या च्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्य व महात्मा गांधी , लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्य खंडाळा व गहुहिवरा ग्रामपंचायत येथे प्लाॅस्टिकमुक्त भारत अभियानाची सुरुवात राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली असता ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आला .
या प्रसंगी विमल बोरकुटे ,चेतन कुंभलकर , रवींद्र केने , निखिल पाटील , जगदीश लुहुरे , वर्षा नागपुरे , सविता तेलोते ,मनीषा हटवार , संगीता वाघमारे , स्वप्नील बॉर्कुटे , धनिरज उके , हरीचंद्र शेंडे , चींधुजी गोरखेडे , जगोजी चाकोले , भेगराज नागपुरे , विनायक गाहाने , रितेश मेश्राम , सह गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्रा चे तनुश्री कैलाश आकरे यांनी केले तर आभार आशुतोष सिंह यांनी मानले .
Maharashtra News Media सच की आवाज