Breaking News

*अभिज्ञान फ़ाउंडेशन आनी रुरल फ़ॉरेस्ट फ़ाउंडेशन तर्फ़े वृक्षारोपण व निसर्गभ्रमंती*

*अभिज्ञान फ़ाउंडेशन आनी रुरल फ़ॉरेस्ट फ़ाउंडेशन तर्फ़े वृक्षारोपण व निसर्गभ्रमंती*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि- दिलीप येवले

नागपुर:- अभिज्ञान फाउंडेशनतर्फे खुबाडा  गेटवर प्लांटेशन ड्राइव्ह आणि नेचर वॉक,  वन्यजीव आणि निसर्गाविषयी जनजागृती करण्यासाठी अभिज्ञान फाउंडेशन आणि ग्रामीण वन संस्था महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने निसर्ग भ्रमंती, वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलीहोती.  तरुणांनी सुमारे 100 झाडे लावली.  120 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात सामील झाले होते.  या नेचर वॉक इव्हेंटमध्ये तरुणांना जैवविविधता आणि वन्यजीवांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली.  त्यांनी अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या विविध प्रजातीचे निरीक्षण केले.  पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला सर यांनी वन्यजीव संवर्धनाविषयी लोकांना संबोधित केले.  तसेच, WWF-India चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि नागपूर चे मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांनी वन्यजीव आणि जैवविविधतेबद्दल थोडक्यात माहिती व जबाबदार नागरिक होऊन वनविभागाला सहकार्य करण्याचेआव्हान केले. 

 किरण पाटील,  सहायक वनसंरक्षक,  वनपरिक्षेत्र  अधिकारी जोशी सर, आरएफओ कदम सर,प्रतिक लेपसे, श्री ढोबळे, मृणाल कावळे, गुंजन जाधव, , आशिष कोहळे, आदित्य वैरागडे उपस्थित होते.  ही वृक्षारोपण मोहीम इव्हेंट ट्रेंडी आणि ऑरेंज सिटी रायडर्स आणि नागपूर एक्स फॅक्टर ग्रुपद्वारे आयोजित केली गेली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …