*जूनी पेन्शन हा विमाशीचा मुख्य अजेंडा- सुधाकर अडबाले*
*हिंगणघाट येथे विमाशी संघाचा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न*
*शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विमाशी कटिबद्ध- व्ही. यू. डायगव्हाणे*
वर्धा प्रतिनिधि – सुरेश बरे
हिंगणघाट – विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका हिंगणघाट व समुद्रपूर चा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तालुका मेळावा रविवार दि. 10 ऑक्टोबर 2021 ला कलोडे सभागृह हिंगणघाट येथे पार पडला. यावेळी या शिक्षक मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून मा.व्ही. यु. डायगव्हाणे सर (माजी शिक्षक आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबई) तर प्रमूख अतिथी म्हणून विमाशीचे सरकार्यवाह तथा विमाशीचे विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक आमदार निवडणुक 2022 चे उमेदवार मा. सुधाकर अडबाले सर, नुटाचे प्रा.बेले सर, आंबेडकर विद्यालयाचे संस्था सचिव जवादे सर , विमाशीचे वर्धा जिल्हाध्यक्ष राजू चंदनखेडे , विमाशीचे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह व सिनेट सदस्य लोंढे सर, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव मा. सुरेशकुमार बरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शंभरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष बोटरे , जिल्हा सचिव प्रमोद खोडे, विमाशीचे भारत पाटील, दिनेश वाघ,संभाजी घाटूर्ले, श्री विष्णूजी इटनकर, राजेंद्र उरकांदे, समुद्रपूर तालुक्याचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर उताणे, कार्यवाह आतिष देवतळे, प्रमोद ढगे, अरुण कोहपरे, शखामनकर सर,संजय अवचट,बबन सोनकुसरे, जगन चेले, धनंजय कापसे, प्रा उमेश ढोबळे, नरेश गलांडे, सुनील दुम्पलवार, अशोक घारे,रामदास लाकडे, कराळे सर, बावनकर सर, खराबे सर, भांगे सर तसेच खाजगी प्राथमीक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय बावनकर, सौ जक्कनवार मॅडम, सौ सिमा खेडकर, सौ दीपाली थुल आदी मान्यवर उपस्थित होते.*
*मेळाव्याची सुरुवात विद्येची आराध्य देवता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. विमाशी ही एकमेव शिक्षकांची लढाऊ संघटना असल्याचा इतिहास आहे. 2005 पूर्वीच्या व 2005 नंतरच्या सर्व शासकीय , निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट जूनी पेन्शन योजना लागू करणे हा विमाशी संघटनेचा मुख्य अजेंडा असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मागील 11 वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न जसे जूनी पेन्शन योजना, वरिष्ठ व निवड श्रेणी, एक तारखेला वेतन न होणे, वेतन अनुदान उशीरा मिळणे, वेतनेत्तर अनुदान न मिळणे, प्रलंबित GPF व मेडिकल बिले, संचमान्यतेचा घोळ, समायोजनाचा घोळ, प्रलंबित कॅशलेस मेडिकल सुविधा अद्याप सुरू न होणे, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, बक्षी समितीचा दुसरा खंड अद्यापही प्रकाशित न होणे, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित पहिला व दुसरा हफ्ता अद्याप न मिळणे, वर्ग 6 ते 8 वरील पदवीधर शिक्षकांना हायस्कूलची वेतन श्रेणी अद्याप न मिळणे, उच्च माध्यमिक शिक्षक, आश्रम शाळा, सैनिकी शाळा, इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेंट मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी येत्या निवडणुकीत विमाशी संघाचा प्रतिनिधी सभागृहात पाठविल्यशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे मि स्वतः उमेदवार आहे असे सर्वांनी आपल्या मनात ठेवून निवडणुकीत भाग घ्यावा असे मत सरकार्यवाह सुधाकर अडबाले सर यांनी व्यक्त केले.*
*नुटाचे प्रा.बेले सर व जवादे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विमाशी ही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करणारी संघटना आहे. जूनी पेन्शन योजना लागू करणे तसेच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम फक्त विमाशी संघटनाच करू शकते त्यासाठी येत्या निवडणुकीत आपण सर्व मिळून सर्वतोपरी प्रयत्न करून विमाशी संघाचे उमेदवार श्री सुधाकर अडबाले सर यांना निवडून आणून सभागृहात पाठविण्याची ग्वाही दिली. यावेळी विमाशीचे जिल्हाध्यक्ष श्री राजू चंदनखेडे, श्री लोंढे सर, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव श्री सुरेशकुमार बरे, विमाशीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद खोडे आदींनी आपले मनोगतात विमाशीचे उमेदवार श्री सुधाकर अडबाले सर यांना येत्या निवडणुकीत निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्याची हमी दिली*
*अध्यक्षीय भाषणात मा. श्री व्ही. यु. डायगव्हाणे सर यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मागील 11 वर्षांपासून प्रलंबीत असलेले अनेक प्रश्न हे सभागृहात विविध आयुधांचा वापर करून सोडविण्यात विद्यमान शिक्षक प्रतिनिधी सपशेल अपयशी ठरलेले आहे म्हणून जुन्या पेन्शन सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे इतर सर्व प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी विमाशीचे उमेदवार श्री सुधाकर अडबाले यांना येत्या काळात सभागृहात पाठविणे ही आता काळाची गरज झालेली आहे. शाळा तिथे विमाशी पोहचवून सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने प्रामाणिकपणे काम करावे असे मत व्यक्त केले.
*विमाशी संघाच्या सदर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला हिंगणघाट व समुद्रपूर येथील शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी विमाशी संघ तालुका हिंगणघाट व समुद्रपूर येथील सर्व तालुका, शहर पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. सदर शिक्षक मेळाव्याचे उत्कृष्ठ संचालन विमाशीचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष श्री गोपाल मांडवकर यांनी तर प्रास्ताविक विमाशीचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री शशिकांत वैद्य यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार विमाशीचे नवनिर्वाचीत कार्यवाह श्री आतिष देवतळे यांनी मानले.*
Maharashtra News Media सच की आवाज