*पारशिवनी येथे काॅंग्रेस पदाधिकार्यांनी केंद्र सरकार च्या विरोधात केले जोरदार प्रदर्शन*
*तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन पाठवुन आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी*
पारशिवनी – उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना चिरडुन टाकण्याचा निषेधार्थ संपुर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे आव्हाहन करण्यात आल्याने पारशिवनी येथे काॅंग्रेस कमेटी च्या पदाधिकार्यांनी केंद्र सरकार च्या विरोधात मोर्चा काढुन , जोरदार प्रदर्शन करुन तसेच तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन पाठवुन आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
सोमवार दिनांक ११ आॅक्टोंबर ला महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी द्वारे क्रुर हत्याकांडाचा निषेधार्थ महाराष्ट्र बंद चे आव्हाहन करण्यात आल्याने या बंद च्या समर्थनात पारशिवनी येथे कॉंग्रेस कमेटी, युवक कॉंग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना , सह शैकडो महविकास आघाडी च्या पदाधिकार्यांनी भाजपा शासित केंन्द्र सरकार च्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करुन व भाजप सरकारच्या विरोधात गांधी चौक, शिवाजी चौक ते तहसील पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला असुन तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवुन आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे . या प्रसंगी मा.दयारमजी भोयर अध्यक्ष तालुका काँगेस कमेटी परशिवनी, मा.बबनरावजी झाडे महासचिव नागपुर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटी, निखिल दादा पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस, सचिन आमले अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पारशिवनी, सौ. मीनाताई कावळे सभापती पंचायत समिती पारशिवनी , चेतन देशमुख उपसभापती पंचायत समिती , सौ. अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्य नागपुर , राजुभाऊ कुसुंबे जिल्हा परिषद सदस्य नागपुर पारशिवनी, करूनाताई भोवते पंचायत समिती सदस्य परशिवनी, सौ. मंगलाताई निंबो पंचायत समिती सदस्य परशिवनी, संदीप भलावी पंचायत समिती सदस्य परशिवनी, अशोकजी चिखले सभापती कृषि. उत्पन्न. बाजार समिती पारशिवनी,शिवाहरीजी भड उपाध्यक्ष , नरेंद्र जिनिंग, जीवलगजी चव्हान अध्यक्ष अनुसूचित विभाग, पुरुषोत्तम जंवजाळ, दीपक वर्मा, बंटी निंबोन, दीपक भोयर, संदीप यादव .गौरव भोयर महासचिव रामटेक विधानसभा यु.कॉंग्रेस, अज्जू पठाण युवक काँग्रेस नेते,आशिष भड, मा.रोशन काळे, छगन शेंद्रे, वैभव मानवटकर सह आदि महाविकास आघाडी चे कार्यकर्ते व समस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज