*मंत्री सुनील केदारांच्या हस्ते रावण दहन* *माझे जीवन गोरगरिबांकरिता,अन्याय अत्याचार व अनास्था खपवून घेत नसल्यानेच मीळते आपले आशिर्वाद- मंत्री केदारांचे प्रतिपादन*

*मंत्री सुनील केदारांच्या हस्ते रावण दहन*

*माझे जीवन गोरगरिबांकरिता,अन्याय अत्याचार व अनास्था खपवून घेत नसल्यानेच मीळते आपले आशिर्वाद- मंत्री केदारांचे प्रतिपादन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः असत्यावर सत्याचा विजयाच्या पर्वावर क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते संपन्न भव्य रावण दहनाला अनेक मान्यवर व नागरिकांची उपस्थिती*

*सावनेर कळमेश्वर युवक काँग्रेस द्वारे मागील अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या पटांगणावर भव्य रावण दहनाचे आयोजन होत होते.परंतू मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोराना संसर्गामुळे सुरक्षिततेच्या दु्ष्टिने तसेच शासनाच्या दिशानिर्देशानूसार सामुहिक आयोजावर बंदी होती.परंतू आता कोरोना ओसरू लागला असल्याने शासनाने अनेक शिथलता आनत सामुहिक आयोजनास परवानगी देल्या जात असल्याने दि.15 आक्टोबर रोजी सायंकाळी 7-00 वाजता मंत्री सुनील केदार,शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,वरिष्ठ अधिवक्ते श्रीकांत पांडे,डॉ.भगत,सावनेर व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन, प्रा.साहेबराव विरखरे,सावनेर नगरपालिकेचे नगरसेवक,नगरितील गणमान्य आदींच्या उपस्थित भव्य रावण दहन करुण असत्यावर सत्याची विजयाचे पर्व साजरे करण्यात आले*

*याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत क्षेत्राचे आमदार व राज्याचे मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की आज दोनवर्षाचे कालांतर लोटले मागील दोन वर्षात जनुकाही जगच थांबून गेले होते.एकमेकांचे सुखदुःख,एकमेकांच्या अडीअडचणीत अधिकच भर पडली होती परंतु आता कोरोना ओसरू लागला आहे आणी जनजीवन सामान्य होऊ लागले आहे.ज्या प्रमाणे आज रावण दहन होत आहे त्याच प्रमाणे या कोरोना महामारीचे ही कायमचे दहन होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत म्हटले की माई जिवन गोरगरिबांच्या आशिर्वादाचा ऋणी आहे.आपणच या सुनील केदारास आशिर्वाद देऊण मोठे केले आपल्या आशिर्वादाने आज राज्यात मंत्री आहे.आपण दिलेल्या आशिर्वादाची परतफेड करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.आपण सध्या एका मोठ्या महामारीतून सावरत आहे आजही आपणास सुरक्षिततेची आवश्यकता आहे.येणाऱ्या एक ते दिड वर्षात आपण माझ्याकडून केलेल्या अपेक्षांवर खरे उतरून आपल्या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी विविध योजनां आखल्या जात आहे.व लवकरच त्या पुर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसनार नाही असा ठाम विश्वास याप्रसंगी व्यक्त केला*

 

*सदर भव्य रावण दहनाला नागरिकांनी अलोट गर्दी केली तर सदर आयोजनाला सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे,व्यापारी संघाचे सचिव यनोज बसवार,किशोर गुर्हारीकर,गोपाल घटे, नगरसेवक सुनील चाफेकर,निलेश पटे,दिपक बसवार,शपीक सैय्यद,सावनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसींग सावजी,बंडू दिवटे,प्रामुख्याने उपस्थित होते तर आयोजनाच्या यशस्वितेकरिता अश्वीन कारोकार,चंदु कामदार,श्रीजय देशमुख,सोनु रावसाहेब,घनश्याम तुर्के,मनीष बारस्कर,आदिंनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …