Breaking News

*ब्रेकिंग न्यूज़* *देवी विसर्जनास गेलेल्या युवकाचा कन्हान नदी पात्रत बुडुन मृत , परिवारा मध्ये शोक चे वातावरण* *विजापुर (खंडाळा) कन्हान नदी घाटावरील घटना , शोधकार्य सुरु*

*ब्रेकिंग न्यूज़*

*देवी विसर्जनास गेलेल्या युवकाचा कन्हान नदी पात्रत बुडुन मृत , परिवारा मध्ये शोक चे वातावरण*

*विजापुर (खंडाळा) कन्हान नदी घाटावरील घटना , शोधकार्य सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागेश्वर नगर बिडगाव येथील नवदुर्गा देवी मुर्ती चे विसर्जन करण्यासाठी बॉयपास चारपदरी नविन पुलाच्या बाजुला कन्हान नदीच्या विजापुर (खंडाळा) घाटात आलेल्या दोन मंडळा पैकी एका मंडळातील मोहित राजेश भिमटे ह्या युवकाचा कन्हान नदी पात्रात बुडुन मृत झाल्याने पोलीसांनी कामठीचे गोताखोर बोलावुन मृतक युवकांचा शोधबीन कार्य सुरु केले आहे
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१६ ऑक्टोबंर ला दुपारी २ वाजता दरम्यान नागेश्वर नगर बिडगाव (पारडी) येथील दोन सार्वजनिक नवदुर्गा मंडळाने नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील नविन पुलाच्या बाजुला कन्हान नदी च्या विजापुर (खंडाळा) घाटाच्या नदी पात्रात देवी मुर्तीचे विसर्जन केल्यावर दोन मुले पाण्यात बुडत असल्याचे दिसल्याने दोन लोकांनी वाचविण्याचा पर्यंत केला असता एका ला वाचविले .

परंतु पाण्याला जास्त प्रवाह असल्याने मोहीत राजेश भिमटे वय १९ वर्ष राहणार. नागेश्वर नगर बिडगाव (पारडी) यास वाचवु शकले नाही. तो नदी पात्रात बुडुन काही दुर वाहत जातांना दिसला नंतर तो दिशेनाशा झाल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले . घटनेची माहीती पोलीसांना दिल्याने कन्हान पोलीस पोहचुन कामठी पोलीसांना बोलाविले. अग्निशमन गाडी व कामठी ढिवर समाजाचे गोताखोर बोलावुन ४.३० वाजता कन्हान नदी पात्रात मोहीत भिमटे ह्या मृतक युवका ला शोधण्याचे कार्य सुरू केले. घटनास्थळी पंचायत समिति कामठी माजी उपसभापती आशिष मल्लेवार व जिल्हा परिषद सदस्या अंवतिका लेकुरवाळे स्वत: पोहचले असुन बातमी लिहे पर्यंत मोहीत चा शोध काही लागला नव्हता.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …