*कन्हान येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरी*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे मिरवणुकीचे जोरदार स्वागत, शहरात ईद ए मिलाद उत्साहात साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणुन मिरवणुक काढुन ‘ ईद-ए-मिलाद ‘ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु मागील दोन वर्षापासुन राज्यात व शहरात कोरोनाचे थैमान चांगलेच पसरल्याने शासनाने सण, उत्सवा वर बंदी होती. सध्या परिस्थितीत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे स्थानिक नगरपरिषद व पोलीस प्रशासना ची परवानगीने या वर्षी शहरात मुस्लिम बांधवानी मिरवणुक काढुन ईद – ए – मिलाद सण उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला.

मंगळवार दिनांक.१९ ऑक्टोंबर २०२१ ला इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणुन ईद – ए – मिलाद सणा निमित्य मुस्लिम बांधवानी मिरवणुक पटेल नगर मस्जिद जवळुन काढुन पिपरी, धरम नगर, आंबेडकर चौक, तारसा चौक, ७ नंबर नाका होत सरळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ४४ ने गांधी चौक येथे आली असता कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये फुलाच्या वर्षाने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही मिरवणुक पटेल नगर मस्जिद येथे पोहचली असता सर्व मुस्लिम बांधवांनी मस्जिद येथे इस्लाम च्या शिकवणीतुन सर्वत्र सुख, शांती नांदावी, मानवाची सर्व त्रासापासुन सुटका व्हावी . यासाठी प्रार्थना करण्यात आली असुन सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळे मिळुन ईद – ए – मिलाद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम आफ ताब आलम, शेख अकरम कुरैशी, शहजाद खान, मोह म्मद अली आजाद, फैजान खान, लतीफ शेख, शादाब शेख, नसर खान, नफीस खान, शाहिद शेख, शहनवा ज कुरैशी, अनस शेख, फिरोज शेख, जाकिर शेख, इब्राहिम शेख, इसराईल शेख, शाहिद राजा, अनीस शेख, शाहरुख खान, शेख गुलाब, फिरोज खान, रसीद शेख, आकिब सिद्धिकी सह मुस्लिम बांधवा मोठ्या संख्येत उपस्थित होते.
तसेच कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पटेल नगर मस्जिद येथे पोहचुन उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना पुष्प गुच्छ देऊन व गळे मिळुन ईद – ए – मिलाद मुबारक हो म्हणत शुभेच्छा देत शहरात ईद – ए – मिलाद सण मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, प्रशांत मसार, सुरज वरखडे, महेंद्र साबरे, हर्ष पाटील, किरण ठाकुर सह आदि मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज