*कन्हान येथे पोलीस स्मृति दिवस निमित्य शहिदांना श्रद्धांजली अर्पण*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे पोलीस स्मृति दिवस निमित्य गांधी चौक कन्हान येथे मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार व पुष्प अर्पित करित दोन मिनटाचे मौनधारण करून कर्तव्य बजावित शहिद झालेल्या सर्व भारतीय पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
गुरुवार दिनांक.२१ ऑक्टोंबर २०२१ ला पोलीस स्मृति दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे पोलीस स्टेशन च्या बाजुला गांधी चौक कन्हान येथे कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, सहायकपोलीस निरीक्षक आमितकुमार आत्राम, पोलीस हवालदार अरूणकुमार सहारे, पोलीस शिपाई शरद गिते व शिक्षिका वर्षा सिंगाडे सह आदि मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व नागरिकांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करून लडाख येथे चीनच्या सैनिका सोबत झालेल्या भाड हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी प्रशांत मसार, महादेव लिल्हारे, संजय चोपकर, बलीराम यादव, सुनिल पाली, हर्ष पाटील, किरण ठाकुर, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह आदि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, महेंद्र साबरे, सुरज वरखडे सह आदि मंच पदाधिकार्यांनी सहकार्य केले .
Maharashtra News Media सच की आवाज