*नागपुरात हत्या च्या गुन्ह्यात वाढ*
नागपुर क्राइम रिपोर्टर
नागपुर – पाचपावली पुलिस स्टेशन अंतर्गत गोल्डी शंभरकर युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक २१ आॅक्टोंबर ला दुपारी १२:०० ते १:०० वाजता च्या सुमारास गोल्डी शंभरकर युवकाची हत्या झाल्याची अत्यंत र्दुदैवी घटना समोर आली आहे . या घटने मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . नागपुरात हत्येचे सत्र सुरुच असुन दिवसेन दिवस सतत एका मागे एक हत्या होत असल्याने पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होत आहे . सतत होत असलेल्या घटनेमुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या घटनांवर तात्काळ उपाय योजन कुठेन न कुठे बंदिश लावण्याकरिता पोलीसांनी प्रत्येक अपराध्यांचा घरी धाड मारुन त्यांचा जवळ असलेले तलवार , चाकु , बंदुक सारखे विविध हथियार जप्त करुन त्यांचा कायदेशीर कारवाई करुन सतत होत असलेल्या घटनांवर बंदी लावण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज