*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान येथे स्वच्छता अभियान*
*कन्हान-पिपरी नगरपरिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी द्वारे परिसर स्वच्छ केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कन्हान – पिपरी नगरपरिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान तारसा रोड ते वाघधरे वाडी पर्यंत स्वच्छता अभियान राबवुन प्लास्टिक वेचुन रस्त्याची स्वच्छता व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
गुरुवार दिनांक.२१ ऑक्टोंबर २०२१ ला कन्हान-पिपरी नगर परिषद व समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य कन्हान तारसा रोड ते वाघधरे वाडी पर्यंत स्वच्छता अभियान राबवुन प्लास्टिक वेचुन, प्लास्टिक मुक्त व रस्त्याची स्वच्छता करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेविका रेखा टोहणे, संकेत तलेवार, महेश बढेल, लकेश माहतो, शुभम येल मुले, शुभम काळबांडे, रविंद्र पाहुणे, सामाजकार्य महाविद्यालय कामठी चे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शशिकांत डांगे, डॉ राष्ट्रपाल मेश्राम, डॉ प्रणाली पाटील, प्राध्यापक उज्वला सुखदेवे, डॉ ओमप्रकाश कश्यप, डॉ मनोज होले, प्राध्यापक निशांत माटे, डॉ मनिष मुंडे, प्राध्यापक आवेशखरणी शेख, प्रतिक कोकोडे, नीरज वालदे, रासेयो स्वयंसेवक श्रद्धा आष्ट णकर, अंगद देवपात्रे, निखिल बागडे, संजय हुमने सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.