Breaking News

*कन्हान येथे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी* *नाभिक समाज कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे नगाजी महाराजांची पुण्यतिथी थाटात साजरी*

*नाभिक समाज कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नाभिक एकता मंच पारशिवणी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज बांधव व मार्गदर्शक संतोष दहिफडकर यांच्या निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली.


शुक्रवार दिनांक.२२ ऑक्टोंबर ला प्रगती नगर कन्हान येथील जेष्ठ समाज बांधव संतोष दहिफळकर यांचे निवास स्थानी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष सुनील लक्षणे च्या अध्यक्षेत व माजी जिल्हाध्यक्ष शरद वाटकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्री संत नागाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी नाभिक समाज एकत्रीकरणा करिता चर्चा करून समाज बांधव व सलुन संचालक एक एकत्र येऊन असोशियन सुरळीतरित्या सुरू ठेवण्याचे आवाहन करून श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण दहिफळकर यांनी केले तर आभार किशोर गाडगे यांनी व्यकत केले. याप्रसंगी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कचरू अंजनकार, सचिव छत्रपती येस्कर, प्रभाकर कावळे, दत्तु खडसे, किशोर गाडगे, मिथुन सूर्यवंशी, रोशन बोरकर, आकाश पंडितकर, राकेश ठाकुर, दिलीप गाडगे सह नाभिक एकता मंच चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …