Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र कोराडी त्यांच्या वतीने प्रागतिक माध्यमिक विद्यालय कोराडी येथे आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला*

*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र कोराडी त्यांच्या वतीने प्रागतिक माध्यमिक विद्यालय कोराडी येथे आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- सेवाभाव परोपकाराची भावना सदामनी असावी या भावनेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव घाडगे उपाध्यक्ष प्रागतिक अध्यापक शिक्षण संस्था नागपूर यांनी भूषविले होते. त्याचप्रमाणे प्रमुख पाहूणे प्रकाश कुंभलकर सचिव प्रागतिक अध्यापक विद्यालय नागपूर वामनराव कुरळकर अध्यक्ष प्रागतिक अध्यापक शिक्षण संस्था नागपूर तसेच मुख्याध्यापिका विद्या समरीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर वाघ मुख्याध्यापक प्रागतिक प्राथमिक विद्यालय, प्रल्हाद दूधपचारे पर्यवेक्षक तसेच डॉ. विकास मातोश्री क्लिनिक माँर्डन स्कूल, कोराडी, डाँ. निधी रावत, डॉ. दिपाली तसेच विनोबा ग्रामीण येथील कल्याण निरीक्षक सुनील चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाघ सहाय्यक शिक्षिका प्रागतिक माध्यमिक विद्यालय तसेच प्रास्ताविक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण निरीक्षक यांनी मंडळात राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती दिली तसेच कौशल्य विकास कार्यक्रमाची सुद्धा माहिती दिली त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव घाडगे यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राबवित असलेल्या उपक्रमाची स्तुती केली व यापुढे सुद्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक दर्शन सोमकुवर तसेच केंद्र महिला कल्याण सहाय्यका सोनाली ठाकरे, ग्रंथपाल उर्मिला सातपुते, केंद्र सेवक युवराज मते तसेच बहुसंख्येने सर्व शिक्षक वृंद व कामगार कुटूंबिय उपस्थित होते. शिबीरामध्ये जवळपास 150 लोकांनी शिबिराचा लाभ घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …