*हेमंत मिटकर व्हाईस चेअरमन नियुक्त*
नागपुर/सावनेरः टेक्स्टाईल असोसिएशनच्या व्हाईस चेअरमन पदी हेमंत मिटकर यांची नियुक्ती मा . मंत्री श्री सुनीलबाबु केदार साहेब यांचा प्रयत्नातून झाल्याने जिटीएन टेक्स्टाईल प्रा.लि.खुरजगाव येथे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन टेक्सटाईल असोसिएशनव्दारे त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
टेक्स्टाईल असोसिएशन ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी वस्त्रोद्योग व्यावसायिकांची संस्था आहे संस्थेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये जीटीएन इंडस्ट्रीज लिमीटेड नागपुर युनीटचे वरीष्ठ उपाध्यक्ष हेमंत मिटकर यांची टेक्स्टाईल असोसिएशनच्या व्हाईस चेअरमन पदी एकमताने निवड करण्यात आली . संस्थेची स्थापना वर्ष 1939 मध्ये करण्यात आली होती . देशात या संस्थेचे 27 हजारापेक्षा अधिक सदस्य असुन देशात 26 संलग्न युनिट्स आहेत . टेक्स्टाईल असोसिएशन ऑफ इंडीया ही संस्था अतीशय प्रतीष्ठीत , जुनी व मजबुत असुन विदर्भातील सर्व टेक्स्टाईल युनीट या संस्थेशी संलग्न आहेत . हेमंत मिटकर यांच्या व्हाईस चेअरमन पदी नियुक्तीमुळे नागपुर भागातील सर्व टेक्सटाईल मिल मधे आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे हेमंत मिटकर यांनी आपल्या या निवडीसाठी मा .मंत्री महोदय सुनीलबाबु केदार यांचे आभार मानले व त्याच्या मार्गदर्शनानुसार विदर्भातील टेक्सटाईल मिलच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला .
*हेमंत मिटकर यांची टेक्स्टाईल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन जिटीएन कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय बसवार तसेच जिटीएन टेक्स्टाईल प्रा.लि चे एच आर सुरेन्द्र महंत आदिंनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केरीत त्यांना पुढील यशस्वीतेकरिता शुभेच्छा दिल्या*
Maharashtra News Media सच की आवाज