Breaking News

*मोवाड ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा विजायादशमी उत्सव साजरा* *पंथसचलन व शस्त्र पुजन व उदबोध*

*मोवाड ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा विजायादशमी उत्सव साजरा*

*पंथसचलन व शस्त्र पुजन व उदबोध*

प्रतिनिधी नरखेड तालुका – श्रीकांत मालधुरे

मोवाड –येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या शाखे कडून संघाच्या विजयादशमी च्या उत्सवाला
प्रमुख अतिथी निळकंठ पुसदकर माजी मुख्याध्यापक
प्रमुख वक्ते नितीन जांभोळकर (विदर्भ प्रांत महाविद्यालयीन विघार्थी कार्यप्रमुख नागपूर)
रामटेक विभागाचे सहकार्यवाह जयंत कळंबे काटोल
मुख्यशिक्षक संकेत चाटी
प्रास्ताविक राहुल होले तालुका कार्यवाह,
सांघिक गीत जयदीप गोहडे
वयक्तिक गीत प्रज्वल खंडारे
सुभाषित सुदेश भोदे
अमृतवचन यश चाळीसगावकर यांनी सादर केले तसेच कार्यक्रम सर्व प्रथम भगवे धवजा समोर संघ प्रार्थना घेणेत आली नंतर मोवाड,नरखेड, खैरगाव ,बेलोना या संपूर्ण गावातील एकुण ५० स्वयंसेवका नी मोवाड येथील उच्च माध्यमिक शाळेच्या परागणावरून पंथसचलन हे मुख्य रस्ते ने काढाणेत आले.त्यानंतर मान्य वर आतिथी याचे हस्ते शस्त्र पुजन व डॉ हेडगेवार, भारत माता,गोळवलकर गुरुजी यांच्या फोटो पुजन करणेत. प्रमुख आतिथी याचे उदबोध झाले प्रमुख वक्ते नितीन जांभोळकर यांनी आपले भाषण मध्ये म्हटले की हिंदू समाजाचे भारत देशाच्या संरक्षणासाठी एक मजबूत संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय तसेच आहिंसा परमो धर्म या तत्त्वला धरून च धर्म चे कार्य होत असते.ज्या राष्ट्र मध्ये शिलवान व शकती संपन्न युवक असेल तेव्हा च देशाची नक्कीच प्रगती होईल. तसेच शरीर, मन,बुद्धी, आत्मा या चार शकती एकत्र आले वरच माणूस सहज यशस्वी होऊ शकतो अशा प्रकारे उदबोध केले.या उत्सवाला मोवाड शहरातील जेष्ट नागरिक तसेच व जेष्ट स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करणे साठी रामेश्वर सेंदरे जिल्हा कार्यवाह,आकाश मानेकर शाखा कार्यवाह मोवाड,श्रीकांत मालधुरे,चेतन ठोबरे,निखिल कठाणे, संदीप राकेश, किरण सेलोकर व ईतर स्वयंसेवक नी मेहनत घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …