Breaking News

*टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रा च्या विकासा साठी १४.५० करोड विकास कामाचे भुमीपुजन* *मंत्री सुनील केदार यांच्या द्वारे जिल्हा परिषद अध्यक्षांचे कौतुक*

*टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रा च्या विकासा साठी १४.५० करोड विकास कामाचे भुमीपुजन*

 

*मंत्री सुनील केदार यांच्या द्वारे जिल्हा परिषद अध्यक्षांचे कौतुक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – टेकाडी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी , कांन्द्री , टेकाडी , च्या विकास कामा करिता १४.५० करोड रुपए विकास कामाचे भुमीपुजन मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न करण्यात आले .
नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी श्यामकुमार बर्वे यांनी आपल्या टेकाडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत टेकाडी,कांन्द्री, जुनीकामठी या गावातील विकास कामांसाठी आजपर्यंतचा सर्वात मोठा १४.५० कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्याचे काम केले असुन रामटेक विधानसभा अंतर्गत येणारी टेकाडी सर्कल ही नेहमीच निधी अभावी विकास कामांसाठी वंचित असल्याचे दिसून येत असल्याने टेकाडी सर्कल अंतर्गत मायबाप मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाची पावती देण्याची वेळ आल्याचे बघता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण,दुग्ध व्यवसाय विकास आणि पशु संवर्धन मंत्री सुनील केदार , पालकमंत्री नितीन राऊत यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करून शरते शेवटी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा दिलेला शब्द पाळण्याला सौ.रश्मी श्यामकुमार बर्वे यांनी सुरवात केली आणि आज मंगळवार रोजी १४.५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण,दुग्ध व्यवसाय विकास आणि पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न करण्यात आले .
कार्यक्रमात मंत्री केदार यांनी बोलतांना सर्कलच्या नागरिकांचे आपण आपल्या सर्कल मधून संपूर्ण जिल्ह्याला योग्य नेतृत्व दिल्याचे वक्तव्य करत नागरिकांचे आभार मानले सोबत रश्मी बर्वे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्याच्या माझ्या निर्णयाचा मलाच अभिमान असल्याचे वक्तव्य करत कोव्हिड काळात घरी न बसता आपल्याला जनतेने ज्या कामासाठी निवडून दिल ते काम योग्यतेने पार पाडण्याचे काम नागपूर जिल्हा परिषदेने अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या नेर्तुत्वात करून राज्यात सर्वात उत्तम कार्य केल्याचे सांगितले.टेकाडी गावाला असलेल्या इतिहासाचा दाखला देत रामसरोवर या तिर्थस्थळाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही तुम्ही फक्त रश्मी बर्वे नावाच नेतृत्व जोपासा अशी विनंती देखील या वेळी केदार यांनी केली.वेकोली कोळसा खाणीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून स्थानिकानाच रोजगार या आशयाची बैठक वेकोली सोबत करू असे ही केदार यांनी आश्वस्थ केले.जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने जिंकलेली पोट निवडणूक ही जिल्हा परिषदेने कोव्हिडं काळात केलेल्या कार्याची पावती असल्याची शाबासकीची थाप मंत्री केदार यांनी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना दिली.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून खितपत पडलेल्या टेकाडी-गोंडेगाव- जुनिकामठी या रस्त्याला अच्छे दिन आणण्याचा संकल्प अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी निवडणुकी दरम्यान घेतलेला होता,मध्यंतरी अनेक अडचणी पुढे आल्यात कोव्हिडं संसर्गाने थैमान मांडल्यानंतर नंतर अनेक मंजूर निधी राज्य शासनाने परत मागविले या सर्वातून सावरत आपण सदर रस्त्यासाठी निधी माननीय पालकमंत्री महोदय कडून मंजूर करून घेतले त्यानंतर मंजूर झालेल्या निधीवर रामटेक विधानसभेतील ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप नोंदवून काम थांबविण्याचे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाला देखील आपण हाणून पाडत या रस्त्याच्या सिमेंटिकरन बांधकामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आज ज्याचे भुमीपूजन संपन्न होऊन लवकरच कामाला सुरुवात होऊन सुचारु स्वरूपाचा रस्ता नागरिकांसाठी तयार असेल. क्षेत्रातील समस्त नागरिकांचे आपण दिलेल्या सहकार्य बद्दल आभार भूमिपूजन कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार सर्कल अंतर्गत येणाऱ्या तिन्ही ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांचे सोबत समस्त कर्मचारी वर्गाचे देखील मनापासून आभार मानतो पुढेही आपना सर्वांचं सहकार्य असच ठेवाल अशी आशा बाळगतो.


या प्रसंगी काॅंग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे , कांन्द्री ग्रामपंचायत बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार बर्वे , सदस्य राहुल टेकाम , चंन्द्रशेखर बावनकुळे , गणेश सरोदे , टेकाडी ग्रामपंचायत सरपंच मीनाक्षी बुधे , जुनी कामठी ग्रामपंचायत सरपंच सुजाता कावडे , योगेंद्र रंगारी , मनिष भिवगडे , रेखा टोहणे , मीना कावडे , चंन्द्रपाल चौकसे , दुधराम सव्वालाखे , गुंफा तिडके , पुष्पा कावडकर , सतीश भसारकर , आकिब सिद्धिकी , प्रशांत मसार , सुरेंद्र बुधे , सह मोठ्या संख्येत काॅंग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …