Breaking News

*गाडेघाट येथे संकेत बावनकुळे यांनी बैठकीत पदाधिकार्यांना केले मार्गदर्शन* *हनुमान मंदिरात व जूनि कामठी येथील श्री महादेव मंदिरात अभिषेक करुन केली पुजा अर्चना*

*गाडेघाट येथे संकेत बावनकुळे यांनी बैठकीत पदाधिकार्यांना केले मार्गदर्शन*

*हनुमान मंदिरात व जूनि कामठी येथील श्री महादेव मंदिरात अभिषेक करुन केली पुजा अर्चना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – जुनी कामठी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गाडेघाट गाव येथे रविवार दिनांक २४ आॅक्टोंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी गाडेघाट गावातील भारतीय जनता युवा मोर्चा चा बैठकीत पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले आणि हनुमान मंदिरात व जूनी कामठी येथील श्री महादेव मंदिरात अभिषेक करून विविध पुजा अर्चना करुन महादेवास साकडे घातले भेट देऊन युवक कार्यकार्ता सोबत संवाद साधला .

या प्रसंगी भाजपा पारशिवनी अध्यक्ष अतुल हजारे , तालुका उपाध्यक्ष भा ज युवा मोर्चा चे पारस यादव, जिल्हा ओबीसी आघाडीचे महामंत्री श्री.रामभाऊजी दिवटे , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री.प्रतिक वैद्य,भूषण इंगोले(ग्रा पं सदस्य) ,महामंत्री-श्री.मनोज गिरी,श्री. आशिष बुरसे,श्री.नरेश मेश्राम, श्री.सौरभ पोटभरे, श्री.सतीश वाडीभस्मे, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.पारस यादव सचिन कामड़े राहुल ढोके, संजय खनते ,राजेन्द्र फुलझेले, योगेश खनते ,रमेश यादव महेंद्र चहांदे आणि इतर युवक कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …