Breaking News

*कांन्द्री ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी*

*कांन्द्री ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री ग्राम पंचायत कार्यालय येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

सोमवार दिनांक २५ आॅक्टोंबर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य कांन्द्री ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन
सरपंच बळवंत पडोळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता सरपंच बलवंत पडोळे यांनी महाराजांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य धनराजी कारेमोरे, प्रकाश चाफले, बैसाखु जनबंधु, महेश झोडावणे, राहुल टेकाम, ग्रामपंचायत सदस्या दुर्गाताई सरोदे, रेखाताई शिंगणे, वर्षाताई खडसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित राहुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विन्रम अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …