Breaking News

*बोरडा ( सराखा ) येथे व देवलापार मार्ग जाणाऱ्या बसेस नियमितपणे सुरू करा – SFI ने निवेदनातून केली मागणी*

*बोरडा ( सराखा ) येथे व देवलापार मार्ग जाणाऱ्या बसेस नियमितपणे सुरू करा – SFI ने निवेदनातून केली मागणी*

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी

बोरडा ( सराखा )-  या गावी जाणाऱ्या व देवलापार मार्गावरील बसेस पूर्वीप्रमाणे नियमितपणे सुरू कराव्या अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( SFI ) च्या वतीने रामटेक बसस्थानक आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. कोरोना चा प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या शाळा व महाविद्यालय पूर्वीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. पण अद्यापही गावागावातून रामटेक तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेस मात्र नियमितपणे सुरू झाल्या नाहीत. त्यातच बोरडा येथे येणारी रामटेक – झिंझेरिया व रामटेक – सिल्लारी या बसेस ही नियमितपणे सुरू झालेल्या नाहीत. बोरडा ( सराखा ) या गावातून सुमारे 90 – 95 विद्यार्थी रामटेक मध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सकाळी उशिरा आल्यामुळे पहिल्या तासिकेचा अभ्यासापासून वंचीत रहावे लागते आहे तर सुट्टी झाल्यावर गावात जाण्याऱ्या बस ची वाट पाहण्यात २ तास वाट बघावी लागत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचा पूर्वीच खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत आता बसेस च्या वाढलेल्या तिकिटे भर घालणार आहेत.


या सर्व परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देऊन बोरडा ( सराखा ) येथे सकाळी येणाऱ्या बसेस नियमितपणे व वेळेवर याव्यात व तसेच या मार्गावरील सोमवारी ते शुक्रवार या दिवशी दुपारी ४ वाजता ची व शनिवारी दुपारी १२ :३० वाजता ची बस सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून एस. एफ. आय. च्या वतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे आगारप्रमुख शी चर्चा केल्यास त्यांनी रामटेक बसस्थानक जवळ 70 पैकी 42 च बसेस काम करत आहेत नेहमीप्रमाणे हेच कारण सांगितलं आहे.
निवेदन देताना एस.एफ.आय.चे अमित हटवार,सुरेंद्र डडमल,अनिकेत नेवारे, कपिल जैतगुडे,अंकुश डडमल सहित अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …