*मोवाड नगर परिषद येथे ” मातृ शकतीचा “ सन्मान व कायदे चे मार्गदर्शन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – नगर परीषद सभागृहात तालुका विधी सेवा समिती नरखेड मधील न्यायाधिश दिवाणी मा. राठोड दिवाणी व फैजदारी न्यायधिश ,निकम ,प्रदीप बांदरे, ईतर कोर्ट कार्मचारी उपस्थित होते.यांची प्रमुख उपस्थिती तसेच न.प.मुख्यधिक्कारी मा. पल्लवी राऊत मोवाड, ब्राह्मदेव देशमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन नरखेड मोवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोवाड शहरातील अनेक बचत गटाच्या महिला उपस्थित होते. ज्या महिला नी आपल्या श्रमाने अथक मेहनतीने मुलांना लहान चे मोठे केले आई पेक्षा वडील ने पण घराबाहेर राहून अथक श्रमघेले एक एक पैसा जमा करून पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सरकारी नोकरी मिळवली अशा महिला च्या सत्कार मान्य वराच्या हस्ते करणेत आला. तसेच मा.राठोड सर यांनी कायदे विषयावर मार्गदर्शन करताना म्हटले की प्रत्येक महिला ना हे कायदे समान आहेत.कूंटुबीक वाद हे नेहमीच घरीच समोपंदेशाने सोडवेत (शाहणे कधी कोर्ट ची पायरी वादतुन चडू नये.) भारतीय संविधान ३९ क समान न्याय व कायदे विषयक मोफत सहभाग
मुलांना मुलगी दोन्ही समानता दुर्बल घटकांना मोफत सहया राज्य शासनाची जबाबदारी आहेत. याची सर्व माहिती ही नालसा मोबाईल अँपलिकेशन गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे.महिला ,१८ वर्ष कमी लहान मुला मुलींना कायदेविषयक मोफत मार्गदर्शन, अनुसूचित जाती यांना कायदेशीर न्याय दिला जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साठोणे ताई यांनी केले तसेच आभार प्रदर्शन ममता बागडे ने केले. कार्यक्रम चे यशस्वी साठी प्रकल्प आधिकारी शितल बांलपाडे ,कल्पना निहुल,शिला राऊत, माजी अध्यक्ष सिमा बागडे, ईतर महिला चे मोलाचे योगदान लाभले .