Breaking News

*कामठी येथे श्री टाॅकीज ला लागली आग* *शाॅटसर्किट ने आग लागल्याचा अंदाज , दोन कोटी रुपयांचे नुकसान*

*कामठी येथे श्री टाॅकीज ला लागली आग*

*शाॅटसर्किट ने आग लागल्याचा अंदाज , दोन कोटी रुपयांचे नुकसान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कामठी – जुने कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत बजरंग पार्क परिसरातील श्री टॉकीज ला शाॅर्टसर्किट मुळे अचानक आग लागल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज श्री टॉकीज चे मालक राजेश शर्मा यांनी सांगितले आहे .


सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक २७ आॅक्टोंबर ला मध्यरात्री २:३० वाजता च्या सुमारास श्री टाॅकीज ला अचानक शॉर्टसर्किटने आग लागल्याने टॉकीज जळून खाक झाले असून अग्निशामक विभागाच्या गाड्या वेळेवरच पोचल्याने आग आटोक्यात आली रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने प्राणहानी टळली आगीत दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार श्री टॉकीज चे मालक राजेश शर्मा यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशनला केली आहे . पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व सिनेमागृह बंद होते .

नुकतेच पंधरा दिवसापूर्वी राज्य शासनाने सर्व सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी दिली असून त्यानुसार श्री टाॅकीज चे मालक राजेश शर्मा यांनी टॉकीज चे रंगरंगोटी व साहित्याचे जुळवाजुळव करून दिवाळीच्या पर्वावर सिनेमागृह सुरू करण्याचा मानस केला होता त्यानुसार टॉकीज मधील सर्व साहित्य व रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले होते बुधवारला मध्यरात्री सुमारास शॉर्ट सर्किटमुळे टॉकीजला आग लागून लागली असता आगीने रुद्र रूप धारण केले शेजारी-पाजारी धावून आले त्यांनी घटनेची माहिती मालक राजेश शर्मा व जुनी कामठी पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले व कामठी नगर परिषदेच्या दोन अग्निशामक गाड्या व नागपूर महानगरपालिकेच्या चार अग्निशामक गाड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या त्यामुळे सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने प्राणहानी टळली आगीत श्री टॉकीज जळून खाक झाली असून सर्व साहित्याची राखरांगोळी झाली आहे त्यामुळे आगीत दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्री टाॅकीज चे मालक राजेश शर्मा यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे पोलिसांनीही शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जुनी कामठी चे प्रभारी ठाणेदार मंगेश काळे यांनी सांगितले आहेत .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …