*फटाका दुकान लावण्यासाठी नप ची परवानगी घ्या* *शहराला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणास आळा घालण्यासाठी नप प्रशासनाला सहकार्य करा* *नगर परिषद प्रशासन द्वारे नागरिकांना कडकडीचे आव्हाहन*

*फटाका दुकान लावण्यासाठी नप ची परवानगी घ्या*

*शहराला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणास आळा घालण्यासाठी नप प्रशासनाला सहकार्य करा*

*नगर परिषद प्रशासन द्वारे नागरिकांना कडकडीचे आव्हाहन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे दिवाळी सण उत्सव निमित्य पाहता शहरात व परिसरात दवंडी फिरवुन फटाक्याचे दुकान लावण्याकरिता नगर परिषद ची परवानगी घ्यावी लागणार असुन बिना परवानगी दुकान आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा ईशारा सर्व फटाका दुकानदारांना देण्यात आला असुन दुकानात शासनाच्या कोरोना काळातील सर्व नियमाचे पालन करावे आणि शहराला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणास आळा घालण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद द्वारे सर्व दुकानदारांना आणि नागरिकांना करण्यात आले आहे .
दिवाळी सण उत्सव जवळ जवळ येत असुन शहरातील नगर परिषद प्रशासना ने कंबर कसली आहे . दिवाळी सण उत्सव लक्षात घेत नगर परिषद प्रशासना ने शहरात शुक्रवार दिनांक २९ आॅक्टोंबर ला शहरात व परिसरात दवंडी फिरवुन फटाक्याचे दुकान लावण्याकरिता नगर परिषद येथे दस्तावेजांसह अर्ज सादर करुन नगर परिषद ची परवानगी घ्यावी लागणार असुन बिना परवानगी दुकान आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा ईशारा सर्व फटाका दुकानदारांना देण्यात आला असुन दुकानात सोशल डिस्टेंस , मास्क , सेनिटाइजर सह शासनाच्या कोरोना काळातील सर्व नियमाचे पालन करावे असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद प्रशासन ने सर्व दुकानदारांना आणि नागरिकांना केले आहे .

यंदाची दिवाळी इको फ्रेंडली साजरी करा – नप प्रशासन

कन्हान शहरात माझी वसुंधरा अभियान २.० ची अमलबजावणी सुरु असुन त्याकामी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणास आळा घालण्यासाठी नगर परिषद कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे उपाय योजना सुरु असुन दिवाळी सणाच्या दरम्यान फटाक्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १०२०/सी १८६/ पोल -९ या नुसार परदेशातुन आयात केलेले फटाके विक्री व त्याचा वापरास प्रतिबंधक घालण्यात आल्याने नागरिकांनी या वर्षी येणार्या दिवाळीत कोणीही फटाक्याची विक्री आणि वापर करु नये यंदाची दिवाळी इको फ्रेंडली साजरी करुन महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कन्हान शहराला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदुषणास आळा घालण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर सह आदि नगर परिषद च्या अधिकार्यांनी सर्व दुकानदारांना आणि नागरिकांना केले आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …