*भक्तिमय दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रम उत्साहात*
*स्वरमुद्रा म्युजिकल इव्हेंट्सनी राबिविला उपक्रम*
*अनेक श्रोते झालेत मंत्रमुग्ध*
नागपुर – दीपावली सणाच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे श्री.संत फुटाने महाराज संस्थान पोटा येथे “भक्तिमय दिवाळी पहाट” संगीतमय कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वरमुद्रा म्यूजिकल इवेंट्सच्या वतीने करण्यात आले होते याप्रसंगी अनेक श्रोते मंत्रमुग्ध झालेत.
भक्तिमय संगीतमय कार्यक्रमा दरम्यान गायकांनी ऐका पेक्षा एक सरस गीते सादर केलीत
स्वरमुद्रा इवेंट्सचे संचालक तुषार सुरपैठणकर यांनी गणपतीला प्रथम वंदन करुण “सुर निरागस हो गणपती” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर पायल भारद्वाज हिने “आली माझ्या घरी ही दिवाळी” तर धनश्री सुरपैठणकर हिने दीपावली “मनाई सुहानी” वैष्णवी भड़ हिने “माय भवानी तुझे लेकरू” उज्वल भड़ याने “अबीर ग़ुलाल उधडीत रंग” गित भजने सादर करून मठात उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली यावेळी भाविकांना घर बसून कार्यक्रमाचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून विठू माऊली फेसबुक चॅनल वरून “भक्तिमय दिवाळी पहाट” कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले होते.

कार्यक्रमा दरम्यान मृदंग नीतिन वानखेड़े, तबला सुभाष हरड़े, हार्मोनियम धनश्री सुरपैठणकर, ऑक्टोप्याड साईश नखाते तर सिंथेसाईजरला भरत इदरे यांनी साथ दिली. टाळ व मृदंगाला साथ निकेश भड़, रोशन वानखेड़े, शुभम लांजेवार, आकाश गोमकाळे आदिनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व डॉ. सुवर्णा जांभुळकर येवले यांनी केले. तर आभार संस्थेचे सचिव चंद्रशेखर लांडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता संजय वंजाळ, तेजराम भड़, चंदू पाटील, पवन गोमकाळे, यांचे सहकार्य लाभले “भक्तिमय दिवाळी पहाट कार्यक्रमा दरम्यान सर्व रसिक श्रोत्यांनी मनसोक्त आंनद लुटला.
Maharashtra News Media सच की आवाज