Breaking News

*कन्हान येथे लक्ष्मी किराणा दुकानात कुलुप तोडुन १७ हजार रूपयाची चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

*कन्हान येथे लक्ष्मी किराणा दुकानात कुलुप तोडुन १७ हजार रूपयाची चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन पासुन काही अंतरावर असलेल्या कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय जवळील फुटपाथ वरील लक्ष्मी किराना दुकानाचे कुलुप कोणीतरी अज्ञात आरोपी ने तोडुन गल्यातील नगदी एकुण १७ हजार रूपये चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
हकीकत अशा प्रकारे आहे कि गोलु शिवलाल यादव वय ३१ वर्ष राहणार. न्यु मार्केट नगरपरिषद कन्हान-पिपरी जवळ राहत असुन नगर परिषद कार्यालय जवळील फुटपाथा वरील लक्ष्मी किराना सामानाची लोंखडी टपरी दुकान आहे. ही दुकान मित्र प्रकाशसिह कुवरसिह बिस्ट राहणार धरमनगर कन्हान यास चालविण्यास दिली असल्याने तो ही किराना टपरी दुकान सकाळी ६.३० वाजता उघडुन दुपारी १२ वाजता बंद करून परत दुपारी २ वाजता उघडुन रात्री ८ वाजता बंद करतो. सोमवार दिनांक.२५ ऑक्टोबंर ला रात्री ८ वाजता बंद करून आपल्या घरी गेला. दुस-या दिवसी मंगळवार दिनांक.२६ ला सकाळी ६.३० वाजता दुकान उघडण्यास गेला असता किराना टपरी दुकाना चे कुलुप तुटलेले दिसल्याने आत पाहिले तर कॉऊंटर मध्ये ठेवलेले १ रूपयाचे सिक्के ३५०० रूपये, ५ व १० चे सिक्के १५०० रू.आणि नोटे १२००० रू. असे एकुण १७००० रूपये अज्ञात चोराने चोरून खाली गल्ला दुकानातच फेकुन पसार झाल्याने फिर्यादी गोलु यादव यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात चोरा विरूध्द अपराध क्रमांक ३९८/२१ कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पोउपनि महादेव सुरजुसे पुढील तपास करित आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …