*कन्हान येथे सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक ३१ आॅक्टोंबर ला सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या अध्यक्षतेखाली व मंच पदाधिकारी कामेश्वर शर्मा यांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , हरीओम प्रकाश नारायण , कामेश्वर शर्मा , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , महेंद्र साबरे , हर्ष पाटील , महादेव लिल्हारे , किरण ठाकुर , शाहरुख खान सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .