*मोकाट कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून फोडण्याचा प्रयत्न आला अंगलट ; कोराडी पोलीस मध्ये FIR दाखल*
नागपूर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपूर:- मनुष्य असो अथवा रस्त्यावरील भटके श्वान असो दोघांनाही स्वतंत्रेचे संवैधानिक अधिकार व कायदयाने सरक्षंण आहे. मनुष्याला वाचा असल्याने तो आपले अधिकार मिळवून घेतो परन्तु रसत्यावरिल बेघर श्वानांशी क्रूरता होत असल्याच्या अनेक घटना दररोज निर्दशनात येत आहेत. रात्रीच्या सुमारास श्वान असामाजिक तत्वापासून परिसराचे रक्षण करतात. पर्यावरणाचे सरक्षंण तसेच मनुष्य प्राणी यांचा समन्वय साधने, प्राण्यांचे सरक्षंण व काळजी घेणे शासन प्रशासन तसेच प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असूनही स्वताच्या स्वर्थापोटी ह्याचा विसर पडलेला दिसतो आहे.
पर्यावरण सरक्षंणाची महत्त्वपूर्ण भूमिका पशुप्रेमी व पशुपक्षीहितार्थ कार्यरत असणाऱ्या मोजक्या संस्था जोपासत असल्याने समाजात पशुक्रूरतेच्या घटना घडल्यास विडिओच्या माध्यमातून लवकरच वायरल होतात अथवा मौखिक माहिती पशुप्रेमीना मिळताच घटनेसम्बधी पूर्ण माहिती घेऊन कायदयाने उचित कार्यवाही हेतु संबधित पोलिस स्टेशनला तक्रार देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन पीडित पशूंना न्याय मिळवुन देण्याचे कार्य करतात.
प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मागील 15 दिवसांत सोशल मीडियावर पशुक्रूरतेचे 2 विडिओ धुमाकूळ घालत आहेत त्यात मौदा तालुका मधील अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमखेडा गावात भटक्या श्वानांचे तोंड व पाय बांधल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. ह्या प्रकरणात देखील तक्रार देण्यात आली असून पोलीस आरोपींविरुद्ध लवकरच कार्यवाही करण्याचे संकेत आहेत. तसेच दुसरे प्रकरण : भटक्या श्वानाला क्रूरतेने पकडून त्याच्या शेपटीला पटाखे बांधून फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांचा विडिओ देखील सोशल मीडियावर दिल्ली मुंबई संपूर्ण भारतभर वायरल झाला आहे.
ह्या दोन्ही प्रकरणांचे विडिओ अत्यंत वायरल होत असून कायद्यांनव्ये त्वरित कार्यवाही करण्याच्या प्रतिक्रिया पशुप्रेमी, पशुप्रेमी संस्था व्यक्त आहेत.
आपल्या मौजेपोटी भटक्या कुत्र्याला पकडून त्याच्या शेपटीला फटाके बांधून फटाक्यांना आग लावून फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांनी स्वताचा विडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला , काही वेळातच हा विडिओ इतका वायरल झाला की दिल्ली मुंबई चे पशुप्रेमी, पशुहितार्थ कार्य करणारे वकील यांच्या पर्यंत पोहचला. ही माहिती आशिष कोहळे (पीपल फॉर animals युनिट-2), R.A.D बहुउद्देशीय संस्था नागपूर व स्वप्नील बोधाने यांना मिळताच स्वतरावर माहिती काढल्यास विडिओ स्मृती नगर, मॉडर्न स्कुल कोराडी रोड परिसरातील असल्याचे कळले व विडिओ मध्ये असणाऱ्या मुलांविषयी माहिती घेण्यात आली.
ह्या घटनेसंबंधीची लेखी तक्रार व सम्पूर्ण माहिती कोराडी पोलीस स्टेशनला देण्यात येताच घटनास्थळ पंचनामा करून पोलिसांनी जीवन बारई नावाच्या मुलावर पशुक्रूरता निवारण अधिनीयम अंतर्गत FIR दाखल केली व श्वानाच्या स्थितीविषयी पुढील तपास करून अन्य कायद्याअंतर्गत देखील गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*प्राण्यांवर अत्याचार होत असल्यास लगेच जवळील पोलीस स्टेशन अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. प्राण्यांवर व प्राणी हितार्थ कार्य करणाऱ्या पशुप्रेमींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडल्यास पोलिसांनी त्वरित गांभिर्याने दखल घेऊन पशुक्रूरता करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.*
*- असे मत पशुप्रेमी स्वप्नील बोधाने नागपूर यांनी स्पष्ट सांगितले*