Breaking News

कुहीच्या ग्रामीण रूग्णालयात डासांचा हैदोस

कुहीच्या ग्रामीण रूग्णालयात डासांचा हैदोस

कुही प्रतिनिधि-निखिल खराबे

गतवर्षी कुही शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात 44 व्या क्रमांकावर होता पण याच कुही शहरातील ग्रामीण रुग्णालयात डासांनी चक्क हैदोस मांडला आहे. रुग्णालयाच्या सभोवताल केर कचरा व गवताचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे तसेच येथील नाल्यांचा उपसा बरोबर होत नसल्याने त्यात पाणी जमा राहत असल्याने डासांची पैदास झपाट्याने होत आहे यामुळे रुग्णालय परिसरात डासांची संख्या वाढल्याने याचा त्रास येथील रुग्णांना होत आहे.
एकीकडे स्वच्छतेचा नारा लावत डास नियंत्रण ठेवावे असा संदेश देणारे आज स्वतःच कुठेतरी हलगर्जी करीत आहेत अशी उघड चर्चा सध्या कुही शहरात होत असून याकडे रुग्णालय प्रशासन लक्ष देईल का असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत…

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …