*सुर्यषष्टी महाव्रत पर्वावर कन्हान नदी घाट व पिपरी घाटावर सांध्य अर्धाने सुर्याची आराधना*
*कन्हान नदी घाटावर छठ पुजा उत्सव थाटात*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात अडीच महिन्यांपासुन कोरोना पुर्णपणे नियंत्रणात असुन ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी कन्हान शहरात श्री सुर्यषष्टी महाव्रत पर्व बडकी छट, सांध्य छट कन्हान नदी पुल घाट व पिपरी घाटावर व्रतधारीनी सांध्य अर्ध दिला सुर्याला. छट पुजे करिता कन्हान नदी रेल्वे व नविन पुलाजवळ आणि पिपरी घाटावर व्रतधारी महिला पुरूषांनी नदी किनारा घाटावर छठ पुजे निर्मित सांयकाळी पाच वाजे पासुन सांध्य अर्धा मावळत्या सुर्याची पुजा अर्चना सह आराधना करण्यात आली.
कन्हान परिसरात कोळसा खाणी असल्याने उत्तर भारतीय लोकांचे बऱ्याच प्रमाणात वास्तव असल्याने कन्हान नदी किणाऱ्यावर उत्तर भारतीय लोकांचा महत्वाचा श्री सुर्यषष्ठी महाव्रत पर्व बडकी छठ पुजा ही भगवान सुर्यदेवाच्या उपासनेचा उत्सव चार दिवस साजरा करण्यात येत असुन छठ पुजेचा सण कार्तिक शुक्ल षष्ठीला साजरा केला जात असला तरी त्याची सुरुवात कार्तिक शुक्ल चतुर्थी छठ पुजेचा पहिल्या दिवसी (नहाय खाय) सोमवार (दि.८) नोव्हेंबर ला स्नान करून नवीन कपडे घालुन उपवास ठेवुन करण्यात आला. छठ पुजेचा दुस-या दिवसी (खरना) मंगळवार (दि.९) ला कार्तिक शुक्ल पंचमीला दिवस भर उपवास करून संध्याकाळीही उपवास केला. त्यास खरना म्हणतात. या दिवशी अन्नपाणी न घेता उपवास करून तांदुळ आणि गुळाची खीर संध्याकाळी खाल्ली. छठ पुजेचा तिस-या दिवसी आज बुधवार (दि.१०) नोव्हेबर ला अर्घ्य ते मावळत्या सुर्या पर्यंत नैवेद्य षष्ठीच्या दिवशी दिला जातो. बांबुच्या टोपल्यां मध्ये प्रसाद आणि फळे सजवुन टोपलीची पुजा केल्या नंतर सर्व भक्त सुर्याला अर्घ्य देण्यासाठी तलाव, नदी किंवा घाट आदी ठिकाणी जाऊन स्नान करून मावळ त्या सुर्याची पुजा अर्चना केली. विधिवत पुजा आणि प्रसाद वितरण करून बडकी छठ पुजा करून सांध्य अर्ध देऊन मावळत्या सुर्याला आराधना करण्यात आली.
छठ पुजेच्या प्रसंगी कन्हान – पिपरी नगर परिषदे च्या नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे, वर्धराज पिल्ले, नगरसेवक राजेन्द्र शेंदरे, अजय लोंढे, कामेश्वर शर्मा, मनोज राय, बलीराम यादव, चंदन सिंह, सुजीत खरवार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे , नरेश बर्वे, कांद्री सरपंच बळवंत पडोळे, बबलु बर्वे, राहुल टेकाम , धंनजय सिंह, प्रताप सिंह, विजय तिवारी, राजु सहानी, चंद्रशेखर सिंह, ओमप्रकाश पाल, कमलेश गुप्ता, अजित सिंह, संतोष गुप्ता सह छट उत्सव सामितीचे पदाधिकारी व भक्तप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.