Breaking News

*अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री*,

*अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री*

उपसंपादक – योगेश कोरडे

नागपुर – मनुष्य आपल्या कर्तुत्वानी मोठा होतो.आणी जेव्हा तो विपरीत परिस्थितीत अनेको अनेक अडथडे पार करुण आपल्या धेय्यपुर्ती कडे निस्वार्थपणे वाटचाल करतो त्या क्षणी त्याच्या नजरेपुढे कोणतेही इतर लक्ष नसुन त्यांनी ठरविलेल्या अथवा निवडलेल्या मार्गावर चलत समाजाकरिता असे काही करुण जातात की अनायसच तोंडातून त्यांच्यावर त्यांनी विपरीत परिस्थितीत केलेल्या कार्याची यशोगाथा गावल्या जातात.


अश्याच आम्हा सर्वांच्या तसेच हजारो अनाथांच्या माई (आई ) पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना नुकाताच राष्ट्रपती भवनात नुकत्याच पार पडलेल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार सन्मान सोहळ्यात मा राष्ट्रपती यांच्या हस्त “पद्मश्री” पुरस्कार प्रदान करुण त्यांच्या अविरत सुरु असलेल्या समाजकार्याची पावती देत सन्मानित करण्यात आले.

माईच्या निस्वार्थ समाजकार्याची केन्द्र शासनाने दखल घेऊन त्यांची निवड पद्मश्री पुरस्कारा करिता केल्याबद्दल माई वर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन महाराष्ट्र न्युज मिडीयाचे मुख्य संपादक, संपादक,व्यवस्थापन मंडळ व समस्त प्रतिनिधींच्या वतीने माई साहेबांच्या कार्याची दखल केन्द्र शासनाने घेतल्याबद्दल तसेच माईला देशातील सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …