Breaking News

*अंबाळा तलावात बुडून युवकाचा करुण अंत*

*अंबाळा तलावात बुडून युवकाचा करुण अंत*

 

रामटेक – अंबाळा तलाव येथे एकोनविस वर्षीय युवकांचा पाण्यात बुडून अंत झाला.
सविस्तर माहीती अशी की ,नागपूर हिवरी नगर येथिल नातेवाईकांच्या दशक्रिया कार्यक्रमाला अंबाळा तलाव येथे आले असता. आर्यन संजय गडरिये वय १९ वर्षे , रा. हिवरी नगर नागपूर हिंमासू सुरेन्द्र सांडेल वय २० वर्षे रा. नागपूर , मानव जागेश्वर कनोजे वय ०९ वर्षे , रा. नागपूर तिघेही दुपारी एक वाजताच्या सुमारास अंंबाळा तलावात आंघोळ करीत असतांना हिंमासू व मानव त्यांना पाण्याचा अंदाज नसल्याने बूडू लागले.त्यावेळी आर्यन त्यांच्या मदतीला धावलाव त्यांनी दोघांना वाचविले. पण आर्यन ला पाहता येत नव्हते.त्यामुळे आर्यन बुडू लागला पण त्यावेळी कुणालाही पोहता येत नसल्यामुळे आर्यन चा मदतीला धाऊ शकले नाही. पण काही वेळांनी मासेमारी करणारे धाव घेत आर्यन ला बाहेर काढले व उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डाॅक्टराने मृत्यु घोषीत.पोलीसांना घटनेची माहीती मिळताच पीएसआय सिमा बेंन्द्रे पंचनामा करुन आकस्मित मृत्यु नोंद करुन पुढिल तपास करीत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …