*सरस्वती इन्स्टिट्यूट मध्ये रोटरी अंतर्गत रोटरॅक्ट क्लब व इंटरॅक्ट क्लब ची स्थापना*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
कोराडी:- रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक ,सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल मध्ये रोटरी क्लब अंतर्गत रोटरॅक्ट क्लब व इंटरॅक्ट क्लब ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निशिकांत काशीकर डिस्टिक रोटरी क्लब नागपुर डाऊनटाऊन , डॉ. शारदा रोशनखेडे अध्यक्ष रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी , रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंकज झगडे, सरस्वती भवन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका केरेन यंगड, सरस्वती भवन कॉन्व्हेंट आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरस्वती भवन कॉन्व्हेंटच्या विभाग प्रमुख स्नेहल ताजने मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यकारी अधिकारी डॉ अर्चना पत्की मॅडम उपस्थित होत्या. सुरुवातीला इटरॅक्ट क्लब च्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष ,संचालक व सदस्य अशा प्रकारचे बॅचेस लावून त्यांचा क्लब तयार करण्यात आला.यामध्ये वर्ग ९वी व वर्ग १० वी चे विद्यार्थी मानसी क्षीरसागर, निशांत गायकवाड, दिव्या खडसे, ओम खडतकर, युनिक कुंबरे, प्रफुल वाघ ,मोहित कलमखेडे, ओम शाहू, तनुज शेळके ,समीक्षा चव्हाण, सोहम वाशिमकर ,सक्षम बागडे, दिव्या वरोरकर, प्रणय पाटणकर ,अल्फिया खान, स्नेहा रणदिवे ,निर्झर शेंडे ,कृष्णा गुप्ता, प्रिन्स प्रजापती, परी नारनवरे, यांची निवड करण्यात आली.त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रोटरॅक्ट क्लब तयार करण्यात आला .यामध्ये गणेश लांडे ,अयाझ बघाडे धीरज उईके,दीप महातपूरे आकाश मोकरकर, शुभम हगडोक, दर्शन पाटील ,पल्लवी राऊत, वैष्णवीका, चंदा मानकर प्राची मोंढे, रिया महल्ले ,कोमल ढेपे, देवयानी गंधलवार ,रिया शिवहरे, भाग्यश्री ठाकरे ,शिवानी वानखेडे, अनुष्का गजभिये, भूषण कडू, सिद्धांत महाजन, प्रांजली कांहोले यांचा समावेश आहे. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले निशांत काशीकर सर यांनी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ची माहिती दिली व विद्यार्थी म्हणून आपण कशाप्रकारे समाज सेवा करु शकतो याचे उदाहरण देखील दिले. त्यानंतर डॉक्टर शारदा रोशनखेडे अध्यक्ष रोटरी क्लब यांनी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब व इंटरॅक्ट क्लब यांच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये विविध प्रकारे आपण जनसामान्यांपर्यंत समाजसेवेचा हात पोहोचू शकतो याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये सरस्वती भवन च्या विभाग प्रमुख स्नेहल ताजणे मॅडम यांनी समाजसेवा ही आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपण मदतीचा हात कशाप्रकारे देऊ शकतो याचा विचार करायला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येकाने सहकार्याने कार्य केल्यास ते पूर्णत्वास कसे जाते हे देखील समजून सांगितले. रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण विकास कशाप्रकारे घडवून आणू शकतो याचे देखील उदाहरणादाखल स्पष्ट केले. संपूर्ण कार्यक्रम संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुवर्णा जांभुळकर, आभार डॉ. अर्चना पत्की यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला.
Maharashtra News Media सच की आवाज