*भाजयुमो खापरखेडा शहर तर्फे नवाब मलिक यांचा विरुद्ध आंदोलन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- नवाब मलिकांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतल्याच्या निषेधार्थ भाजयुमोच्या वतीने खापरखेडा येथे आंदोलन झाले
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध,मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिधी समोर आणले आहेत.
१९९३ बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान व सलीम पटेल याच्या सोबत असलेले परभणीचे पालकमंत्री यांचे व्यावाहारीक संबंध देशद्रोह्या सोबत संबंध असल्यामुळे या निषेधार्थ भाजयुमो नागपूर जिल्हाच्या वतीने नवाब मलिक यांनी राजीनाम्या साठी आंदोलन करण्यात आले. आदर्श पटले, श्यामराव सरोदे, यांच्या मार्गदर्शनाखाली *अण्णा मोड खापरखेडा* येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राजेश गायकवाड, आशिष फुटाणे ( महामंत्री- भारतीय जनता युवामोर्चा सावणेर ग्रा), पिंटू सातपुते, सचिन नागरकर , खडसे, नितीन गोस्वामी,निलेश कंगाली, कुणाल निंबाळकर उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज