*चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतीचा ६० व्या स्थापना दिवस मोठ्या उत्सहात साजरा*

*आजी माजी जिप व पंस व सरपंच, सदस्य यांना शाल, श्रीपळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले*
*जुन्या राजकारण्यांचा गोष्टीला उजाडा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
खापरखेडा:- चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतच्या ६० व्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी चिचोली जि.प.सर्कल परिसरातील माजी जि.प. व पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच आदी आजी माजी पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

राज्यात पंचायत अस्तित्वात आल्यानंतर चिचोली (खापरखेडा) ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक ११ नोव्हेंबर १९६१ ला करण्यात आली चिचोली ग्रामपंचायतचे वर्तमान सरपंच पुरुषोत्तम चांदेकर संकल्पनेतून ६० स्थापना दिवस व चिचोली ग्रामपंचायतच्या स्थापने पासून तर आज पर्यंत राहिलेले माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह चिचोली जि.प.सर्कल अंतर्गत जि.प.व पं.स.सदस्य व पत्रकार बंधूंचा भव्य सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अनुषंगाने ११ नोव्हेंबर रोजी स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिचोली खापरखेडाचे प्रथम सरपंच स्व.रणछोड़दास
वैष्णव यांचे पुत्र श्यामकुमार वैष्णव होते तर सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, उपसरपंच अर्चना ठवरे, ग्रामविकास अधिकारी विजय लंगडे, ग्रा.स. संदीप सोमकुवर, नीता जालंदर, संगीता गजभिये, मंगला नखाते, माला पानतावने, अनुसया भजभुजे आदि प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी श्यामकुमार वैष्णव, मेहमूद खान, सरपंच धनराज डेहरिया, प्रकाश लांजेवार, हेमराजसिंह परिहार, कल्पनाताई वंजाळ, उपसरपंच कृष्णा घोडेस्वार, अमर जैन, प्रभारी क्रिष्णा नमलेवार, यांच्यासह जि.प.सुशीला घोडेस्वार, सुनीता घेर, पुष्पा ढोके यांच्यासह यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच प्रकाश लांजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गावाचा विकास करण्यात निधी अपुरा पडत असल्याने चिचोली ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळविण्या करिता प्रयत्न करावे असे भावनिक आव्हान केले तर सरपंच पुरुषोत्तम चांदेकर यांनी सत्कारमूर्तीचा गावाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे सांगितले.
यावेळी मंचावर उपस्थित अनेक मान्यवरांची भाषणे झालीत. प्रास्ताविक व आभार सरपंच पुरुषोत्तम चांदेकर यांनी केले
कार्यक्रमा दरम्यान गावकरी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज