*आणि गरीबांच्या चेहर्यावर फूलले हसु – कैलाश बरबटे*

*दिवाळी निमित्त गरीबांना कपडे वाटप व भेट वस्तु*

विशेष प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
मौदा – दिवाळी सणाच्या आनंदापासून कोणीही व्यक्ती वंचित राहू नये म्हणून चाचेर निमखेड़ा जिल्हा परिषद सर्कल मधील गरीबांना कपड्यांचे व भेटवस्तुंचे वितरण जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबत मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. त्याच बरोबर कोरोना काळात या सर्कल मधील कर्मचारी यांनी खरे कोरोना योद्धा म्हणून रात्रन – दिवस गावात मोठ्या हिमतिने काम केले अशांना सुद्धा मिठाई भेटवस्तु व मिठाई देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. दिवाळी श्रीमंता सोबत गरिबांच्या घरीही साजरा व्हावा म्हणून जिल्हा सदस्य कैलाश बरबटे यांनी गरीबांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असुन गरीब गरजूंना त्यांनी कपडे वाटप व भेटवस्तू दिले. तसेच त्यांना आर्थिक भेट सुद्धा देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांना आर्थिक मदत करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.

सत्ता आणि संपत्ती उपजीविकेचे साधन ठरते. पण जीविका ठरू शकत नाही. माणसाच्या स्वभावात त्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असे म्हणतात. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही गोष्ट संपत्ती पेक्षा मोठी असते. या विचाराने आणि दृष्टिकोन असणारे माणसे मनाने आणि संपन्न असतात. ज्यांच्या तोंडात साखर असल्यागत सतत गोड़ ठेवणारे आणि डोक्यावर बर्फ रस्त्यालगत शांत .संयमी व्यक्तिमत्व असली माणसे आपल्या जीवनात यशस्वी होतात. अशा शांत, संयमी नेतृत्वाचे धनी म्हणून जि प सदस्य कैलाश बरबटे यांची ओड़ख होते. दिवाळीच्या तोंडावर गरीबांच्या व कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा आज तोंड गोड करण्यात आला. त्यांची आज दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांनी सुद्धा बरबटे यांचे मोठे कौतुक करुण त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

Maharashtra News Media सच की आवाज