*कन्हान येथे आधुनिक शहीद स्मारक व शहरातील युवकांकरिता खेळाचे मैदान उपलब्ध करण्याची मागणी*
*सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाचे नप नगराध्यक्षा ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : –कन्हान तारसा रोड शहीद चौक येथील शहीद प्रकाश देशमुख स्मारक आधुनिक पध्दतीने स्मारक तयार करण्याचा मागणी करिता भारतीय सैनिक दलातील सेवानिवृत्त माजी सैनिकांनी नप नगराध्यक्षा सौ करूणाताई आष्टनकर यांची भेट घेऊन आधुनिकरित्या शहीद स्मारक तयार करण्याची योजना सविस्तर समजावित युवकांकरिता खेळाचे मैदान उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कन्हान शहराचा विर सैनिक शहीद प्रकाश देशमुख हा भारतीय सैनिक दलात असतांना काही वर्षा अगोदर आतंकी हल्याच्या मुठभेडीत सोबत च्या सैनिकांचे जीव वाचविण्याकरिता व देशाच्या रक्षणार्थ आतंकवादी यांना धरा शाही करून आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वत: शहीद झाल्याने त्याच्या बलीदानाच्या स्मृती प्रित्यर्थ तारसा रोड चौक कन्हान येथे शहीद स्मारक निर्माण करून शहीद प्रकाश देशमुख चौकाचे नामकरण करण्यात आले होते. पण तारसा रोडच्या नविनीकरणात अरुंद रोड ला आता रुंद करण्यात आल्याच्या अनुषंगा ने तारसा रोड स्थित प्रकाश देशमुख शहीद स्मारकास नव्याने आधुनिक पध्दतीने स्मारक तयार करण्याचा मागणी करिता सेवानिवृत्त सैनिकांच्या शिष्टमंडळांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर यांना भेटुन आधुनिकरित्या शहीद स्मारक तयार करण्याविषयी सविस्तर चर्चा करून स्मारक कश्या प्रकारे तयार करायचे ती डिझाईन सुद्धा आम्ही तयार करून आपणास सादर करण्यास समर्थता दर्शविल्याने संबंधित शिष्टमंडळास आपुलकीची हाक ऐकुण सध्या आचारसंहिता असल्याने यास उशीर होईल परंतु ही संपताच त्वरित आधुनिक शहीद स्माकाचे काम हातात घेऊन पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे नग राध्यक्षा आष्टनकर हयांनी शिष्टमंडळास आस्वस्त केले . तसेच शिष्टमंडळाने कन्हान शहर मोठे असुन सुध्दा येथील नव युवकांकरिता व्यायाम करण्यास, खेळण्यास व भारतीय वायु, जल, जमिनी सैनिक दलात आणि पोलीस भरतीच्या सरावा करिता एक चांगले मैदान, धावपट्टी नसल्याने शहरातील युवक शासकीय सेवेत भर्ती करिता मागे पडुन निराश होऊन व्यसनाच्या आहारी युवा पिढी ओढली जावुन अपराधीक तत्वाने त्यांचे आयुष्य बेकार होत सामाजिक व्यवस्था बिघडत आहे. यास्तव शहरात एक चांगले खेळाचे पटांगण (मैदान) युवकांकरिता उपलब्ध करून देण्यास प्रेरित करून आम्ही सेवानिवृत्त सैनिक युवकांकरिता प्रशिक्षण वर्ग राबवुन युवकांचा मैदानी व्यायाम, सराव करून घेण्यास मदत करण्याची हमी देत शिष्टमंडळाने आधुनिक शहीद स्मारक व हक्काचे खेळाचे मैदान तयार करण्याची मागणी केली आहे . याप्रसंगी शिष्टमंडळात शहीद प्रकाश देशमुखची आई लीलाबाई, वडील रायभान, धाकटा भाऊ प्रदीप देशमुख आणि प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक राजेश यादव, सिधु ढोके, भरत पगारे सह सेवानिवृत्त माजी सैनिक वृंद उपस्थित होते.