Breaking News

*विद्यार्थ्यांनी कायद्याचा व ज्ञानाचा वापर समाजासाठी करा! – सुनील केदार* *डी. डि. भोयर येथे नवीन इमारतींचा शुभारंभ*

*विद्यार्थ्यांनी कायद्याचा व ज्ञानाचा वापर समाजासाठी करा! – सुनील केदार*

*डी. डि. भोयर येथे नवीन इमारतींचा शुभारंभ*

मौदा – विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच  कठोर परिश्रम ,सामाजिक निरीक्षण करणे गरजेचे असून कायद्याची पदवी संपादन करत असतांना मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी उपयोग करायला हवा असे मत पशुसंवर्धन व दुध विभाग व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

         मौदा येथील उज्वल बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित डि.डि. भोयर कला व विज्ञान महाविद्यालयात नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा काल शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर सायंकाळी 7. वाजता पार पडणार आहे.

      या नवीन इमारतीचे उद्घाटन पशुसंवर्धन व दुध विभाग व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

          प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जी. प. अध्यक्ष सुरेश भोयर. जिल्हा परिषद कृषि सभापती तापेश्वर वैद्य.  बबनराव तायवाडे.  कार्यकारी अध्यक्ष उज्वल बहुउद्देशीय संस्था नागपूर  रमेश भोयर. सचिव बहुउद्देशीय संस्था नागपूर सतीश भोयर. प्राचार्य डॉ. संजय खुदळे. हुकुमचंद आमदरे. वंदना सिंगणजुड़े. शालिनी देशमुख. सोनू कूथे. दिलीप वंजारी. देवेंद्र गोडबोले. न्यानेश्वर वानखेड़े. तुळशीराम काळमेघ. रामप्रसाद पराते. विक्की साठवणे. स्वप्निल श्रावणकर. सुभम तिघरे. येथील शिक्षक वृंद व कर्मचारि उपस्तित होते..

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड़ॉ. सतीश भोयर. यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल वासनिक. यांनी तर आभार प्राचार्य ड़ॉ संजय ख़ुदळे यानी केले…

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …