Breaking News

*कन्हान येथे विविध ठीक ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘बालक दिवस ‘ म्हणुन थाटात साजरी* *पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान आणि सार्वजनिक वाचनालय द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे विविध ठीक ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘बालक दिवस ‘ म्हणुन थाटात साजरी*

*पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान आणि सार्वजनिक वाचनालय द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३२ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान आणि सार्वजनिक वाचनालय द्वारे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बालक दिवस म्हणुन थाटात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली .

*पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान*

स्वातंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘ बालकदिवस ‘ म्हणुन पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या सयुंक्त विद्यमाने थाटात साजरी करण्यात आली.
रविवार दिनांक.१४ नोव्हेंबर २०२१ ला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम पी आस्टकर यांच्या अध्यक्षेत व जेष्ट शिक्षक टी सी खंडाईत, सौ पुष्पा कुणाल कोल्हे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दिप प्रज्वलित करून बालकदिवस कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रा श्री खानजोडे सर यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री टी सी खंडाईत सर यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपीक श्री रतन रेखाते यांनी मानले .
या प्रसंगी कार्यक्रमात विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी प्रामुख्या ने उपस्थित राहुन बालकदिवस थाटात साजरा करण्यात आला.

*सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान*

कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती ‘ बालकदिवस ‘ म्हणुन साजरी करण्यात आली.
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे सकाळी १० वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासुदेवराव चिकटे , प्रमुख अतिथी श्री एन के खनजोडे गुरुजी यांच्या हस्ते पुष्प हार माल्यार्पण करुन व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. संस्थेचे सचिव श्री मनोहर कोल्हे, रोशन तांडेकर, कु कृष्णाली कोल्हे आदीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत बालक दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ग्रंथपाल श्याम बारई यांनी तर आभार कृणाल कोल्हे यांनी मानले. याप्रसंगी अभिषेक निमजे, रोशन तांडेकर, उदय पाटील, नैतिक खंडाईत, कस्तुरी कोल्हे, शुभम शेंडे सह नागरिकांना अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …